गो कोरोना गो म्हणत स्वप्निल जोशीने पोस्ट केला हा थ्रोबॅक फोटो

By  
on  

गेल्या चार महिन्यांपासून असलेली कोरोनाग्रस्त परिस्थिती आणि त्यात लॉकडाउनमुळे विविध अडचणींना सामोरं जावं लागत आहे. हे कोरोनाचं संकट कधी निघून जातय याचीच सगळे वाट पाहत आहेत.

अभिनेता स्वप्निल जोशीनेही कोरोनाला खास विनंती केली आहे. तो गो कोरोना गो असं म्हणतोय. सध्या सोशल मिडीयावर थ्रोबॅक फोटोंचा ट्रेंड असताना स्वप्निल जोशीने त्याचा एक जुना फोटो पोस्ट केला आहे. या फोटोला त्याने "गो कोरोना गो" कृपया असं कॅप्शन लिहीलय. आणि हात जोडून विनंती करणारा हा फोटो पोस्ट केला आहे.

या कोरोनाग्रस्त परिस्थितीत मनोरंजन विश्वातील कलाकारांनाही विविध अडचणींना सामोरं जावं लागत आहे. म्हणूनच अभिनेता स्वप्निल जोशी देखील हा कोरोना कधी एकदाची निघून जाईल याची वाट पाहतोय.

Recommended

Loading...
Share