By  
on  

पाहा Video : या कारणामुळे अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या डोळ्यातून आलं पाणी

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीसाठी हिरकणी हा सिनेमा कायमच महत्त्वाचा ठरेल. हा सिनेमा आणि या सिनेमाच्या आठवणी तिच्यासाठी कायम खास आहेत याविषय़ी तिच्या सोशल मिडीया पोस्टवरून पाहायला मिळतय. ही भूमिका आणि या भूमिकेसाठी तिने घेतलेली मेहनत कौतुकास्पद होती. सध्या लॉकडाउनच्या काळात या सिनेमाशी निगडीत असलेल्या विविध आठवणी सोनाली सोशल मिडीयावर शेयर करतेय.

सोनालीने नुकताच या सिनेमाच्या तयारीदरम्यानचा एक थ्रोबॅक व्हिडीओ शेयर केला आहे. हिरकणीच्या भूमिकेसाठी सोनालीला तिचं नाकही टोचून घ्यावं लागलं होतं. मात्र ते पारंपरिक पद्धतीने करावं असं या सिनेमाचे दिग्दर्शक प्रसाद ओक यांचं म्हणणं असल्याचं ती सांगते. तिने या पोस्टमध्ये सोनाराकडे नाक टोचतानाचा व्हिडीओ शेयर केला आहे. मात्र ते करत असताना जराही न कळवळता न रडता तिने हे करून घेतलं. फक्त त्यामुळे तिच्या डोळ्यातून पाणी आलेलं या व्हिडीओत पाहायला मिळतय. 

 

ती या पोस्टमध्ये लिहीते की, "काही गोष्टी मात्र जुन्या, पांरपरिक पद्धतीनेच कराव्या.. असं आजी आणि प्रसाद ओक म्हणतात...म्हणून ‘हिरकणी’ साठी १/२ वर्षांपूर्वी सोनाराकडून नाक टोचून घेतलं होतं तेव्हा. मंजिरी ओक यांचे विशेष आभार...सगळ्याच बाबतीत."

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive