पाहा Vidoe : लॉकडाउनमध्ये मिथिला पालकर शिकली ही गोष्टी, पोस्ट केला व्हिडीओ

By  
on  

लॉकडाउनमध्ये सध्या घरात बसून फिटनेसकडेही लक्ष दिलं जातय. विशेषकरून कलाविश्वातील कलाकार घरातच व्यायाम आणि योगा करत आहेत. यात त्यातलेही विविध प्रकार शिकणं, किंवा ऑनलाईन फिटनेस ट्रेनिंग घेणंही कित्येक जण करत आहेत.

अभिनेत्री मिथिला पालकरही सध्या ऑनलाईन फिटनेस ट्रेनिंग घेत आहे. यात नुकतच तिने हेडस्टँड करण्यासाठी सुरुवात केली आहे. नुकतीच मिथिला हेडस्टंँड करायला शिकली असून तिने तिच्या ट्रेनिंग सेशनचा एक व्हिडीओही शेयर केला आहे. ट्रेनरच्या इन्स्ट्रक्शनचं पालन करू हळूहळू हडेस्टँड करायला मिथीला शिकली आहे.

 

लॉकडाउनच्या काळात मिथिला सोशल मिडीयावर सक्रिय दिसली. तिचे काही फोटो आणि व्हिडीओ ती पोस्ट करताना दिसते. 

आगामी काळात मिथिला ही रेणुका शहाणे दिग्दर्शित 'त्रिभांगा' सिनेमात झळकणार आहे. नेटफ्लिक्सवर हा सिनेमा रिलीज होणार आहे. या सिनेमात मिथिला अभिनेत्री काजोलसोबत झळकणार आहे.

Recommended

Loading...
Share