By  
on  

पाहा Photos : भाऊ अभिनयकडून स्वानंदी बेर्डेला वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा

लक्ष्मीकांत बेर्डे आणि प्रिया बेर्डे यांची कन्या स्वानंदी बेर्डेवर वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. सोशल मिडीयावर तिच्या वाढदिवसानिमित्ताने शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. यातच भाऊ अभिनय बेर्डेनेही तिला खास अंदाजात  शुभेच्छा दिल्या आहेत. 

अभिनयने स्वानंदीसोबतचे काही फोटो सोशल मिडीयावर पोस्ट केले आहेत. तो या पोस्टमध्ये लिहीतो की, "कुणीतरी आता या जगात दोन दशके पूर्ण केली आहेत. म्हणजे आनंद आणि प्रेमाची दोन दशके. वाढदिवसाच्या शुभेच्छा स्वांदो."

 

या पोस्टमध्ये अभिनयने स्वानंदीसोबत काही खास क्षण पोस्ट केले आहेत. शिवाय तिचे जुने फोटोही पोस्ट केले आहेत.  दोघा भावा बहिणींची ही जोडी कायम चर्चेत असते.

मराठी सिनेसृष्टीत अभिनेता असलेल्या अभिनयची बहीण स्वानंदीदेखील लवकरच या कला विश्वात डेब्यू करणार असल्याचं बोललं जातय. मात्र सोशल मिडीयावर आत्तापासूनच तिचा चाहतावर्ग तयार झाला आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive