लॉकडाउनच्या तीन ते चार महिन्यांनंतर मनोरंजन विश्वाचं काम हळूहळू सुरु झालेलं पाहायला मिळतय. त्यातच काही कलाकार सेटवर चित्रीकरण सुरु झाल्याने आनंदी आहेत. मात्र अभिनेत्री प्राजक्ता माळीसाठी हा आनंद मात्र निराळाच आहे. कारण प्राजक्ता ही सध्या एक नाही दोन नाही तर चक्क चार वाहिन्यांवर दिसत आहे.
'जुळून येती रेशीमगाठी' या मालिकेतून प्राजक्ता माळी लोकप्रिय झाली आणि प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. आणि बऱ्याच वर्षांनंतर आता याच मालिकेचं पुन:प्रक्षेपण सुरु करण्यात आलं आहे. झी युवा वाहिनीवर ही मालिका सध्या प्रसारीत होत आहे. याशिवाय 'महराष्ट्राची हास्यजत्रा' या विनोदी कार्यक्रमात प्राजक्ता सुत्रसंचालन करतेय. नुकतच याही कार्यक्रमाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे या कार्यक्रमाची नवे भाग सध्या प्रसारित होत आहेत. सोनी मराठी वाहिनीवर हा कार्यक्रम प्रसारित होतो.
लॉकडाउनच्या आधी प्राजक्ताने 'मस्त महाराष्ट्र' या ट्रॅव्हल शोसाठी चित्रीकरण केलं होतं. आणि या शोचं प्रसारणही सुरु करण्यात आलं आहे. लिव्हींग फुड्ज आणि झी मराठी अशा दोन वाहिन्यांवर हा कार्यक्रम प्रसारित होतो.
म्हणजेच तब्बल चार वाहिन्यावंर विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून प्राजक्ता झळकतेय. प्राजक्ताच्या चाहत्यांसाठी देखील ही पर्वणीच असल्याचं म्हणता येईल. शिवाय तिने तिचा हा आनंद सोशल मिडीयावर शेयर करूनही सांगीतला आहे. या पोस्टमध्ये प्राजक्ता लिहीते की, "आपल्या सगळ्यांची इच्छाशक्ती फळाला आली... Finally..”जुळून येती रेशीमगाठी” कालपासून झी युवावर ७ वाजता पुन: प्रक्षेपित व्हायला लागली आणि याचबरोबर, आता एकाच वेळी ४ वेगवेगळ्या वाहिन्यांवर आपले कार्यक्रम दिसताहेत; हा निराळाच आनंद पदरात पडला...१- जुळून येती रेशीमगाठी २- महाराष्ट्राची हास्यजत्रा ३- मस्त महाराष्ट्र ४ मस्त महाराष्ट्र
५- Prajaktamali यूट्यूब चॅनेल हवं तेव्हा, थोडक्यात काय, मी झालेय - लॉकडाउन फळलेली कलाकार"
तेव्हा या विविध कार्यक्रमांमधून विविध वाहिनींवर प्राजक्ता प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. शिवाय या चार कार्यक्रमातून तृप्त झाल्यानंतर पाचवा पर्यायही तिने या पोस्टमध्ये लिहीला आहे. प्राजक्ताने नुकतच तिचं युट्यूब चॅनेलही सुरु केलय. युट्यूबवरही प्राजक्ताचे विविध व्हिडीओ चाहत्यांना पाहायला मिळतात.