By  
on  

स्क्रिप्ट वाचताना अभिनेता शरद केळकरला लागते ही गोष्ट

मनोरंजन विश्वात कित्येक चहा आणि कॉफी प्रेमी पाहायला मिळतात. यातलाच एक आहे अभिनेता शरद केळकर. शरदला चहा आवडते. मात्र चहा एका विशिष्ट वेळी घ्यायला त्याला आवडतं. याविषयी नुकतीच त्याने पोस्ट केली आहे. 

शरद त्याच्या पोस्टमध्ये लिहीतो की, "स्क्रिप्टसोबत अदरक वाला कटिंग चहा, तुम्हीपण चहाचे हौशी आहात ?"

 

चहाचा शौकीन शरद त्याच्या चहाप्रेमाविषयी या पोस्टमध्ये लिहीतो. स्क्रिप्ट वाचताना शऱदला कटिंग चहा हवा असतो असं तो या पोस्टमध्ये म्हणतो. शिवाय चाहत्यांनाही प्रश्न विचारतोय.

हिंदीसह मराठी सिनेमांमधूनही शरदने त्याचं अभिनय कौशल्य दाखवलं आहे. सुरुवातीला मालिकांमध्ये त्याने साकारलेला खलनायकही चर्चेत आला होता. हिंदीमधील बऱ्याच मोठ्या सिनेमांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिकांमध्ये शरद आत्तापर्यंत दिसला आहे. शरदने 'बाहुबली' सिनेमाच्या हिंदी वर्जनसाठी दिलेला आवाजही लोकप्रिय ठरला. सोशल मिडीयावरही शरदचा मोठा चाहतावर्ग आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive