मराठी बिग बॉसच्या या स्पर्धकासोबत झळकणार पुष्कर जोग, हे आहे कारण

By  
on  

मराठी बिग बॉस कार्यक्रमात आत्तापर्यंत विविध कलाकार झळकले आहेत. पहिल्या पर्वात अभिनेता पुष्कर जोग हा दुसऱ्या क्रमांकाचा स्पर्धक ठरला होता. तर अभिनेत्री स्मिता गोंदकर तिसऱ्या क्रमांकाची स्पर्धक ठरली होती. बिग बॉसच्या घरात जरी दोघांची नोकझोक पाहायला मिळाली असली तरी या शोनंतर दोघांची मैत्री कायम राहिली. 

पुष्कर आणि स्मिता याआधी कधीच एकत्र झळकले नव्हते. मात्र आगामी एका गाण्यात दोघं एकत्र झळकणार आहेत. पुष्करने नुकताच त्याचा स्मितासोबतचा सेटवरील फोटो पोस्ट करून याविषयीची माहिती दिली आहे. एका म्युझिक व्हिडीओसाठी तो स्मितासोबत झळकणार असल्याचं तो या पोस्टमध्ये म्हटला आहे. 

या पोस्टमध्ये पुष्कर लिहीतो की, "सहा महिन्यांनंतर स्मिता गोंदकरसोबत शुट करतोय एका म्युझिक व्हिडीओसाठी. अधीक माहितीसाठी वाट बघा"

 

या गाण्याच्या निमित्ताने पुष्करने जवळपास सहा महिन्यांनी चित्रीकरणाला सुरुवात केली आहे. तर स्मितासाठीही हे लॉकडाउननंतरचे पहिलं शुट ठरले असेल. आता या बिग बॉस स्पर्धकांची ही केमिस्ट्री गाण्यात कशी पाहायला मिळेल हे पाहणं औत्सुक्याचं आहे. बिग बॉसमध्ये झळकलेले हे स्पर्धक या गाण्यात काय कमाल करतील यासाठी बिग बॉसचे चाहतेही उत्सुक असतील यात शंका नाही.

Recommended

Loading...
Share