By  
on  

स्वप्निल जोशीने करुन दिली लोकल ट्रेनची आठवण, शेयर केला हा फोटो

 

सध्या सोशल मिडीयावर थ्रोबॅक पोस्टचा ट्रेंड सुरु आहे. कोरोनाग्रस्त परिस्थितीत घराबाहेर पडता येत नसल्याने बहुतांश कलाकार जुन्या आठवणी आणि जुने फोटो थ्रोबॅक म्हणून पोस्ट करत आहेत.

अभिनेता स्वप्निल जोशीनेही त्याची खास थ्रोबॅक आठवण शेयर केली आहे. स्वप्निल जोशीने लोकल ट्रेनमधून प्रवास करतानाचा त्याचा फोटो पोस्ट केला आहे. आता हा फोटो प्रवासादरम्यानचा आहे की शुटिंग दरम्यानचा हे काही त्याने सांगीतलेलं नाही.

स्वप्निलचा हा फोटो पाहून सध्या बंद असलेल्या लोकल ट्रेनची आठवण स्वप्निलने करुन दिली आहे. सध्या स्वप्निलदेखील सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात सक्रिय झाला आहे.

शिवाय 'पिल्लू टिव्ही' या त्याच्या युट्यूब चॅनेलला देखील चांगला प्रतिसाद मिळतोय.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive