By  
on  

पाहा Video : मराठी बिग बॉस फेम स्मिता गोंदकर अशी खेळली होती क्रिकेट

सोशल मिडीयावर सध्या थ्रोबॅक पोस्टचा ट्रेंड सुरु आहे. लॉकडाउनच्या काळातही अनेक जण त्याचे जुने फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करताना दिसले. लॉकडाउनमध्ये कित्येक जण घरातच असल्याने जुन्या आठवणींना उजाळा देत होते.

 

अभिनेत्री स्मिता गोंदकरनेही नुकताच एक थ्रोबॅक व्हिडीओ पोस्ट केला आहे. स्मिता या व्हिडीओमध्ये क्रिकेट खेळताना दिसत आहे. या व्हिडीओत स्मिता जबरदस्त फलंदाजी करताना दिसत आहे. या व्हिडीओत स्मिताचं बॅटने चेंडू टोलवण्याचं कौशल्य पाहायला मिळतय. स्मिताला स्पोर्ट्सची प्रचंड आवड असल्याने ती क्रिकेट खेळणही पसंत करते. स्मिताच्या चाहत्यांनाही तिचा हा व्हिडीओ प्रचंड आवडला आहे.

विविध मराठी सिनेमांमध्ये झळकणारी स्मिता गोंदकर बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वात स्पर्धक म्हणून दिसली होती. स्टंट मेनिया या शोमध्येही तिने उत्कृष्ट कामगिरी केली होती. स्टंट बायकर म्हणूनही तिची ओळख आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive