By  
on  

असं करण्यात आलं 'आई माझी काळुबाई'च्या प्रोमोचं चित्रीकरण, पाहा मेकींग

सध्या प्रेक्षक पुन्हा पौराणिक मालिकांकडे वळल्याचं पाहायला मिळतय. विविध वाहिन्यांवर येणाऱ्या विविध पौराणिक मालिकांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं चित्र समोर आहे. यातच आता 'आई माझी काळुबाई' ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेत अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड आणि अलका कुबल मुख्य भूमिकेत आहेत.  नुकताच या मालकेचा प्रोमो देखील प्रदर्शित झाला होता. आणि आता नुकतच या मालिकेच्या प्रोमोचं मेकिंग प्रदर्शित करण्यात आलं आहे.

या मेकिंगमध्ये या मालिकेचा प्रोमो कसा चित्रीत करण्यात आला हे पाहायला मिळतय. या व्हिडीओत प्राजक्ता या मालिकेतील तिच्या आर्या नावाच्या भूमिकेविषयी सांगतेय. अभिनेत्री अलका कुबल या मालिकेत काळुबाईच्या भूमिकेत दिसली. याआधीही त्यांनी 'काळुबाईच्या नावानं चांगभलं' या सिनेमात काम केलं होतं. आणि आता पुन्हा एकदा त्या काळुबाईच्या रुपात दिसतील. या प्रोमोच्या मेकिंगमध्ये त्याचंही काळुबाईच्या रुपातलं चित्रीकरण पाहायला मिळतय. या मालिकेत अभिनेता शरद पोंक्षे यांचीही महत्त्वाची भूमिका आहे.प्राजक्ताच्या वडिलांच्या भूमिकेत ते दिसतील.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

मालिकेच्या प्रोमोला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला आणि म्हणूनच घेऊन आलो आहोत 'आई माझी काळुबाई' प्रोमोचं हे मेकींग. 'आई माझी काळुबाई' लवकरच पाहाआपल्या सोनी मराठीवर. काळुबाईच्या नावानं चांगभलं! @its_prajaktaa @sharadponkshe @niranjanpatki #आईमाझीकाळुबाई #AaiMaziKalubai #काळुबाईच्यानावानंचांगभलं । #KalubaichyaNavanChangbhal #सोनीमराठी #SonyMarathi #विणूयाअतूटनाती #VinuyaAtutNati

A post shared by Sony मराठी (@sonymarathi) on

 

या मालिकेच्या प्रोमोला मिळालेल्या उदंड प्रतिसादामुळे प्रोमोचा हा मेकिंग व्हिडीओ प्रदर्शित करण्यात आला आहे. सोनी मराठी वाहिनीवर लवकरच ही मालिका पाहायला मिळणार आहे.

 

Recommended

PeepingMoon Exclusive