पाहा Video : 'फर्जंद' फेम अंकित मोहने 17 वर्षांपूर्वी केली होती व्यायामाला सुरुवात, आता दिसतो इतका फिट

By  
on  

 हिंदी मालिकांमधील प्रसिद्ध चेहरा अंकित मोहन मराठीत झळकला आणि मराठीतही लोकप्रिय झाला.. 'फर्जंद' या सिनेमातून मराठी प्रेक्षकांची पसंती त्याने मिळवली. त्याची उत्कृष्ट शरीरयष्ठीचे प्रेक्षक चाहते झाले.  याच फिटनेसचं श्रेय अंकित त्याच्या वडिलांना देतो. 

अंकितने नुकतेच त्याचे व्यायाम करतानाचे व्हिडीओ पोस्ट केले आहेत. यासोबतच तो कॅप्शनमध्ये लिहीतो की, "आजपासून 17 वर्षांपूर्वी व्यायामाला सुरुवात इथूनच केली होती. वडिलांनी शिकवलं होतं की शरीर आणि तब्येत बनवण्यासाठी वस्तूंची आणि माणसांची गरज नाही लागत विश्वासाची गरज असते. हे तुमचं जीवन आणि तुमचं शरीर आहे त्याची काळजीदेखील आपल्यालाच घ्यायची असते. वाकायचं नाही आणि हरायचही नाही."

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

जय बजरंग बली आज से 17 साल पहले वर्जिश की शुरुआत यही से हुई थी और पिताजी ने यह सिखाया था की शरीर और सेहत बनाने के लिए चीज़ों की और लोगों की ज़रूरत नहीं होती सिर्फ़ मन में विश्वास की ज़रूरत होती है .... यह आपकी ज़िंदगी है और आपका शरीर तो ध्यान भी आपको ही देना है .... ना झुकना और ना हारना बस मेहनत करना धन्यवाद #अखाड़ा #घर #वर्जिश #हरहरमहादेव

A post shared by अंकित मोहन (@ankittmohan) on

वडिलांनी दिलेली ही शिकवण त्याच्या आजही लक्षात आहे. म्हणूनच या व्हिडीओमध्ये उपलब्ध असलेल्या वस्तूंचा वापर करून अंकित व्यायाम करताना दिसतोय. कधी विटा घेऊन तर कधी दरवाजाच्या कडेला लटकून तो व्यायाम करतोय. वडिलांनी दिलेली हीच शिकवण त्याच्या कामी आली. आणि याच फिटनेसमुळे अंकितला आता कला विश्वात वेगळी ओळख मिळाली आहे.

Recommended

Loading...
Share