आज 15 ऑगस्ट म्हणजेच स्वातंत्र्य दिनानिमित्ताने सगळीकडे उत्साहाचं वातावरण आहे. सोशल मिडीयावर स्वातंत्र्य दिनानिमित्ताने एकमेकांना शुभेच्छा दिल्या जात आहेत. कुणी तिरंग्याचे फोटो तर कुणी तिरंगी वेशभुषेतील फोटो पोस्ट करत आहेत. विविध पद्धतिने देशभक्ती व्यक्त केली जात आहे.
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीनेही या दिवसानिमित्ताने खास पोस्ट केली आहे. तिने चाहत्यांना तिरंगी शुभेच्छा दिल्या आहेत. सोनालीने हिरवा, केशरी आणि पांढरा अशा तिन रंगाचे कपडे परिधान केलेले फोटो पोस्ट केले आहेत. या प्रत्येक रंगाचं वेगळं महत्त्व आहे. शिवाय सोनाली नुकतीच एका स्वदेश ब्रँडची एम्बेसेडरही झाली असल्याने तिने ही पोस्ट केली आहे.
ती या पोस्टमध्ये लिहीते की, “स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा या स्वातंत्र्यदिनी करू स्वदेशीचा जयघोष.... स्वदेशी वापरूया...भारताला आत्मनिर्भर बनवूया....”