By  
on  

निशीकांत कामत यांना श्रद्धांजली देताना शरदने दिला या आठवणीला उजाळा

प्रसिद्ध दिग्दर्शक निशिकांत कामत यांच्या निधनाने सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. ज्या कलाकारांनी त्यांच्यासोबत काम केलं होतं त्यांनीही दु:ख व्यक्त केलं आहे. अभिनेता शरद केळकरनेही निशिकांत कामत यांच्यासोबत काम केलं आहे. त्यांच्या निधनाने त्यालाही धक्का बसला आहे. नुकतच शरदने सोशल मिडीयावर पोस्ट करून दु:ख व्यक्त केलं आहे. शरदने निशिकांत यांची आठवण म्हणून त्यांच्यासोबतचा फोटो पोस्ट केला आहे.

शरद या पोस्टमध्ये लिहीतो की, "एका अभिनेत्यासाठी पूर्ण जग मोठ्या वेगाने चालत असतं सर, तुमची ही ओळ एका स्माईलसोबत. तुमच्या हास्याची कायम आठवण येईल. तुमची आठवण येईल."

 

निशिकांत कामत यांच्या 'लय भारी' आणि 'रॉकी हँडसम' या सिनेमात शरद झळकला होता. 

निशिकांत यांच्या जाण्यानं अनेक कलाकार हळहळले आहेत. काहींनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून त्यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive