लॉकडाउनच्या काळात पुन्हा पौराणिक मालिकांचं वेड प्रेक्षकांना लागलेलं पाहायला मिळतय. एकीकडे लॉकडाउन सुरु असताना अनेक जुन्या पौराणिक मालिका प्रेक्षकांना पुन्हा पाहायला मिळाल्या. मात्र आता एक नवी मराठी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सध्या बाप्पाच्या आगमनाची तयारी सुरु असतानाचा टेलिव्हिजनवरही बाप्पाचं दर्शन होणार आहे. 'जय देवा श्री गणेशा' ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
या मालिकेती अभिनेत्री भाग्यश्री मोटे ही माता पार्वतीच्या भूमिकात पाहायला मिळेल. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या प्रोमोमध्ये माता पार्वतीची झलक पाहायला मिळतेय. भाग्यश्रीने तिच्या सोशल मिडीया अकाउंटवरही काही फोटो पोस्ट केले आहेत. भाग्यश्रीचे पार्वती मातेच्या रुपातील हे फोटो आहेत.
याआधी भाग्यश्री मराठीसह विविध हिंदी मालिका, सिनेमे आणि वेब सिरीजमध्येही झळकली आहे. मात्र पुन्हा मोठ्या कालावधीनंतर भाग्यश्री टेलिव्हिजन कमबॅक करत असल्याचं पाहायला मिळतय. ही मालिका खास 11 भागांची असेल.