यंदा कोरोनाग्रस्त परिस्थितीत अनेक गणेश भक्तांनी इको-फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करण्याचं ठरवलय. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी गेल्या काही वर्षांपासून घरातच इको-फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करते. सोनालीचा भाऊ अतुल कुलकर्णी ही मूर्ती घडवतो आणि त्यावर सोनाली इको-फ्रेंडली रंग चढवते. यंदाही शंकराच्या रुपातली मूर्ती त्यांनी तयार केली आहे.
सोनालीने यंदाही आपल्या परिवारासोबत गणरायाची मनोभावे पूजा केली. तब्बल 50 वर्षांपासून सोनालीकडे दहा दिवसांसाठी बाप्पा विराजमान असतात. गणेशोत्सवाच्या निमित्ताने सोनालीने पिपींगमून मराठीच्या माध्यमातून चाहत्यांना शुभेच्छा दिल्या यावेळी ती म्हणते की, "ऐरवी गणेशोत्सव म्हटलं की गर्दी असते, जल्लोष असतो पण यावर्षी कोरोनाग्रस्त परिस्थितीत गर्दी टाळायची आहे. यंदाचा गणेशोत्सव जबाबदारीनं आणि काळजीपूर्वक साजरा करायचा आहे."
यंदा कोरोनाग्रस्त परिस्थितीत सगळ्या गोष्टींची काळजी घेत गणेशोत्सव साजरा करण्याचं आवाहन सोनालीनं केलय.