By  
on  

"पुढच्या वर्षी लवकर या" म्हणत मराठी कलाकारांनी दीड दिवसांच्या बाप्पाला दिला निरोप

मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांच्या घरी दीड दिवसांसाठी बाप्पा विराजमान असतात. काल अनेक कलाकारांनी दीड दिवसांच्या बाप्पाला निरोप दिला. काहींनी यावर्षी कोरोनाग्रस्त परिस्थितीत घरातच बाप्पाचं विसर्जन केलं आहे.

प्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या घरी देखली दीड दिवस बाप्पा विराजमान असतात. त्यांनीही बाप्पाला निरोप देऊन बाप्पाचं घरातच विसर्जन केलं आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

पुढच्या वर्षी लवकर या️

A post shared by Kedaar Yeshodhara Shinde (@kedaarshinde) on

 

प्रसिद्ध दिग्दर्शक रवी जाधव यांची घरातच तयार केलेली बाप्पाची मूर्ती विराजमान असते. त्यांनी देखील दीड दिवसांच्या बाप्पाला निरोप दिला आहे. त्यांनीदेखील घरातच बाप्पाचं विसर्जन केलं. पुढच्या वर्षी लवकर या आणि गणपती चालले गावाला चैन पडेना आम्हाला म्हणत लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात आला.

 

अभिनेत्री मिताली मयेकरनेही दीड दिवसांच्या बाप्पाचं विसर्जन केलं. नुकत्यात केलेल्या पोस्टमध्ये मिताली म्हणते की, "निरोप घेतो देवा, आता आज्ञा असावी..चुकले आमचे काही, त्याची क्षमा असावी."

 

यासह अभिनेता संतोष जुवेकर, जुई गडकरी आणि अनेक कलाकारांनी दीड दिवसांच्या बाप्पाल निरोप दिला आहे.

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive