'आई कुठे काय करते' ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय झाली. या मालिकेत आईच्या भूमिकेत दिसणारी अभिनेत्री मधुराणी प्रभुलकरच्या अभिनयानेही प्रेक्षकांची मनं जिंकली. प्रेक्षकांमध्ये तिची आई म्हणूनच आता ओळख निर्माण झाली आहे. यासह मालिकेतील इतर प्रत्येक पात्रही उत्तम लिहीली गेली आहेत. त्यामुळे मालिका पाहणं रंजक वाटतं.
या मालिकेतून आई म्हणून लोकप्रिय झालेली आई खऱ्या आयुष्यातही आई आहे. मधुराणीला एक गोंडस मुलगी आहे. मधुराणीने नुकतच गणेशोत्सवाच्या निमित्ताने मुलीसोबतचा फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत मधुराणी मुलीला मोदक भरवताना दिसतेय. अभिनेत्री मधुराणी ही दिग्दर्शक प्रमोद प्रभुलकर यांची पत्नि आहे.
सोशल मिडीयावर आई आणि मुलीचा हा रियल लाईफ फोटो चांगलाच चर्चेत आला आहे.