By  
on  

पाहा Video : अप्सरा आली ! सोनाली कुलकर्णीची इन्स्टाग्राम रीलवर धमाकेदार एन्ट्री

सोशल मिडीयावरील विविध प्लॅटफॉर्मवर सध्या वेगवेगळ्या गोष्टी पाहायला मिळतात. टीकटॉक एप्लिकेशन बॅन केल्यानंतर इन्स्टाग्रावर रील हे नवीन फिचर आणलं गेलं. मनोरंजन विश्वातील कलाकार या फिचरचा चांगलाच आनंद लुटत आहेत.

मराठीतील विविध अभिनेत्रींनी देखील रील फिचरचा वापर करत विविध व्हिडीओ तयार केले आहेत. अप्सरा फेम सोनाली कुलकर्णीची देखील आता रीलवर एन्ट्री झाली आहे. नटरंग या सिनेमातील म्युझिकवर व्हिडीओ करून सोनालीने रील व्हिडीओ पोस्ट केला आहे. सोनालीचा हा पहिलाच रील व्हिडीओ आहे.

कोणतही नवीन फिचर सोशल मिडीयावर आलं की सेलिब्रिटी मंडळी ते करून पाहतात. सोनालीला देखील कित्येक दिवसांपासून रील व्हिडीओ करण्याची इच्छा होती. आणि अखेर सोनालीने देखील रीलवर धमाकेदार एन्ट्री केली आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Entering the world of #instagramreels like.... #myentry #natarang #khelmandala #reels @instagram

A post shared by Sonalee Kulkarni (@sonalee18588) on

 

हा व्हिडीओ पोस्ट करून सोनाली लिहीते की, "इन्स्टाग्राम रीलच्या जगात एन्ट्री करताना." नटरंग या सिनेमाने सोनालीला एक वेगळी ओळख दिली आहे. याच सिनेमातील 'अप्सरा आली' या गाण्याने सोनालीची एक ओळख निर्माण झाली.

सोनालीच्या चाहत्यांनाही हा व्हिडीओ प्रचंड आवडला आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive