अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या 'हिरकणी' या सिनेमाला प्रेक्षकांच्या पसंतीची पावती मिळाली. बऱ्याचदा ग्लॅमरस अवतारात दिसणारी सोनाली या सिनेमाच्या निमित्ताने एका वेगळ्या रुपात आणि वेगळ्या भूमिकेत दिसली. सोनालीच्या या भूमिकेतील अभिनयाचं प्रचंड कौतुकही झालं.
नुकतच झी गौरव पुरस्कार 2020 च्या कार्यक्रमासाठी नुकतीच सोनाली कुलकर्णीने हजेरी लावली. 'हिरकणी' सिनेमाच्या निमित्ताने सोनालीने या कार्यक्रमासाठी खास साज केला होता. वेल्वेट साडी आणि चांदीच्या दागिन्यांचं कॉम्बिनेशन करत तिने पारंपारिक वेशभुषा केली होती.
सोनालीने नुकतेच या कार्यक्रमासाठी केलेल्या लुकचे फोटो पोस्ट केले आहेत. या लुकमध्ये सोनाली अतिशय सुंदर दिसत आहे. चाहत्यांनाही तिचा हा लुक प्रचंड आवडला आहे. सोशल मिडीयावर सोनालीचा हा लुक चर्चेत आहे.