कलाकार कोणत्याही कॉन्ट्रावर्सीपासून स्वत:ला लांब ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न करत असतात. त्यातही राजकीय घडामोडींवर कोणतंही आक्षेपार्ह भाष्य करणंही टाळतात. पण वैभव मांगलेने सद्य स्थितीवर गाण्याच्या माध्यमातून भाष्य केलं आहे. याशिवाय खास शैलीतून राजकिय व्यक्तींना शालीतून फटकेही दिले आहेत.
वैभवने नुकतंच एक गाणं सोशल मिडियावर अपलोड केलं आहे. श्रीनिवास खळेंच्या ‘गेले ते दिन गेले’ या गाण्याचं विडंबन तो यात करत आहे. आता निवडणुकीची धामधुम आली की राजकीय पक्षांचं मतदाराशी बदलणारं वागणं हे गाण्यात आहे. ‘आले ते दिन आले’ असे बोल असलेलं हे गाणं राजेश देशपांडेने लिहिलं आहे. वैभव सध्या ‘अलबत्या गलबत्या’ नाटकाच्या प्रयोगात व्यस्त आहे. तो या नाटकात चिंची चेटकिणीची व्यक्तिरेखा साकारत आहे.
https://www.youtube.com/watch?time_continue=43&v=PctgxUewLhM