अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या घरी दरवर्षी बाप्पा विराजमान असतात. सोनालीकडे दरवर्षी दहा दिवसांसाठी गणपती असतो. सोनालीच्या घरी दरवर्षी बाप्पाची इको-फ्रेंडली मूर्ती विराजमान असते. दहा दिवस बाप्पांची मनोभावे पूजा केल्यानंतर आज अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने बाप्पाल निरोप देण्यात आला आहे.
यावेळी गणपती बाप्पा मोरया पुढल्या वर्षी लवकर या म्हणत बाप्पांना निरोप देण्यात आला.
यावेळी सोनालीचा फियान्से कुणाल बनोडेकरही उपस्थित होता. सोनालीने नुकतच बाप्पाचं घरात विसर्जन करतानाचा व्हिडीओ पोस्ट केला आहे.