By  
on  

इशा केसकरला येत आहे या जागेची आठवण, पोस्ट केला थ्रोबॅक फोटो

कोरोनाग्रस्त परिस्थितीत लॉकडाउनच्या काळात अनेक जणं बऱ्याच गोष्टी मिस करत आहेत. मात्र जुन्या आठवणी पाहुन त्यांना उजाळा दिला जातोय. अभिनेत्री इशा केसकरही या कोव्हीडच्या फैलावामुळे प्रचंड वैतागली आहे. इशाला सुमद्रकिनाऱ्यावर जाण्याची प्रचंड आवड आहे. मात्र सध्याच्या परिस्थितीत कुठे बाहेर जाता येत नसल्याने, विशेषकरून बीचवर जाता येत नसल्याची खंत तिने व्यक्त केली आहे.

कोरोना सारखी महामारी येण्याआधी ती कशी बीचवर मजा करायची असं सांगणारी पोस्ट तिने केली आहे. सोशल मिडीयावर इशाने तिचा बीचवरील हॉट फोटो पोस्ट केला आहे. शिवाय सध्याच्या काळात तिला बीचवर जाण्याची इच्छा होत असल्याचही ती सांगते. 

सोशल मिडीयावरील इशाच्या चाहत्यांना मात्र तिचा हा थ्रोबॅक फोटो आवडला आहे.

 

इशा ही आत्तापर्यंत विविध मालिका आणि सिनेमांमध्ये झळकली आहे. 'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेत तिने शनायाच्या भूमिकेत अभिनेत्री रसिका सुनीलला रिप्लेस केलं होतं. तिची शनायाची भूमिका चांगलीच लोकप्रिय ठरली होती. मात्र आता तिच्या जागी पुन्हा रसिका सुनील शनायाच्या भूमिकेत दिसतेय. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive