पाहा Video : 'जीव झाला येडापिसा' मधील शिवा फिटनेससाठी अशी घेतो मेहनत

By  
on  

'जीव झाला येडापिसा' मालिकेतील शिवा हा कमी कालावधीतच प्रचंड लोकप्रिय झाला. अभिनेथा अशोक फळ देसाई ही भूमिका साकारतोय. पहिल्याच मालिकेतून अशोक हा शिवाच्या भूमिकेतून प्रचंड लोकप्रिय झाला आहे. शिवाचा फिटनेस त्याची बोलण्याची लकब ही प्रेक्षकांना प्रचंड आवडते. मात्र याच फिटनेससाठी अशोक हा प्रचंड मेहनत घेतो.

अशोकने नुकताच सोशल मिडीयावर त्याचा वर्कआउट करतानाचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. तो या पोस्टमध्ये लिहीतो की, "जेव्हा तुम्ही शेवटच्या रेपिटेशनमध्ये जवळपास मेल्यासारखे असता तेव्हा तुमचा जिम पार्टनर तुम्हाला अजून दोन करण्यासाठी सांगतो."

 

हे कॅप्शन जरी मजेशीर असलं तरी अशोक त्याच्या फिटनेससाठी किती मेहनत घेतो हे पाहायला मिळतय. मुळचा गोव्याचा असलेल्या अशोकने 'जीव झाला येडापिसा' या मालिकेसाठी जवळपास दहा ते पंधरा किलो वजन वाढवलं असल्याचं बोललं गेलं होतं. आणि आता याच मालिकेसाठी त्याची फिट शरीरयष्ठी महत्त्वाची आहे. याच भूमिकासाठी लागणारा फिटनेस ठेवण्यासाठी अशोक वर्कआउट करताना अशी मेहनत घेत असल्याचं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळतय. याशिवाय त्याला फिटनेसची आवड असल्याचही यात कळून येतय.

Recommended

Loading...
Share