प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे. 'आई माझी काळुबाई' या मालिकेच्या सेटवर त्यांना कोरोनाची लागण झाली. त्यानंतर त्यांना लगेचच रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
एवढचं नाही तर आशालता यांच्यासोबत या मालिकेत सेटवर काम करणाऱ्या इतर 27 जणांनाही कोरोनाची लागण झाली असल्याचं वृत्त आहे. या मालिकेच्या चित्रीकरणादरम्यान मुंबईतून एक डान्स ग्रुप सेटवर आल्याने त्यांच्यामार्फत हा संसर्ग झाल्याचं बोललं जातय.