पाहा Photos : बिग बॉस फेम स्मिता गोंदकरने शेयर केल्या पॅरिस ट्रीपमधील या आठवणी

By  
on  

अभिनेत्री स्मिता गोंदकरला फिरण्याची आणि भटकंती करण्याची प्रचंड आवड आहे. स्मिताला देशातील विविध ठिकाणी किंवा देशाबाहेर फिरायलाही आवडतं. प्रवास करायला आवडणारी स्मिता सोशल मिडीयाच्या माध्यमातून तिच्या प्रवासातील खास क्षण पोस्ट करत असते. मात्र सध्या कोरोनाग्रस्त परिस्थितीत कुठे जाता येत नसल्याने अनेक कलाकार सोशल मिडीयावर त्यांच्या थ्रोबॅक पोस्ट करत आहेत. स्मितानेही तिच्या पॅरिस ट्रीपचे काही थ्रोबॅक फोटो पोस्ट केले आहेत.

या फोटोंमध्ये स्मिता प्रसिद्ध आयफिल टॉवरसोबत काढलेले फोटो पाहायला मिळतात.

स्मिता ही तिच्या बाईक स्टंट्स साठी ओळखली जाते. त्यानंतर मराठी बिग बॉसच्या पहिल्याच पर्वात स्मिता दिसली होती. या शोमधून स्मिताने तिची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

Recommended

Loading...
Share