EXCLUSIVE : या व्यक्तिसोबत सोनाली कुलकर्णी रिलेशनमध्ये, यंदा आहे लगीनघाई

By  
on  

कलाकारांच्या खासगी आयुष्यात काय सुरु आहे हे जाणून घ्यायला  सगळ्यांनाच आवडतं. त्यातच ते कलाकार जर प्रसिद्ध स्टार असतील तर आणखी उत्सुकता असते. अशीच उत्सुकता होती अप्सरा फेम सोनाली कुलकर्णीच्या लग्नाची. बऱ्याच कालावधीपासून सोनालीच्या लग्नाच्या चर्चा होत होत्या. सोनालीने ती रिलेशनमध्ये असल्याचही एका मुलाखतीत म्हटलं होतं. मात्र सोनाली ज्या व्यक्तिसोबत रिलेशनशीपमध्ये आहे याची एक्सक्लुझिव्ह माहिती पिपींगमून मराठीला मिळाली आहे. 

सोनालीने तिच्या इन्स्टाग्राम पोस्टमधूनच या गोष्टीचा इशारा देखील दिला आहे. सोनाली सध्या परदेशात आहे आणि विविध एडवेंचर स्पोर्ट्सही करत आहे. नुकताच तिने एक व्हिडीओही पोस्ट केला आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्येच सोनालीनं तिच्या रिलेशनशिप विषयीचा खुलासा केला आहे.
सोनाली म्हणते की, “मी माझ्या नव्या प्रवासाला माझ्या पार्टनरसोबत सुरुवात करत आहे, साहसी चढ उतारासाठी मी तयार आहे”
या कॅप्शनमध्येच सोनालीने तिच्या आगामी वाटचालीचा खुलासा केल्याचं दिसत आहे. सोनालीने या पोस्टमध्ये एका खास व्यक्तिला टॅगदेखील केले आहे.

सोनालीने ज्या पार्टनरचा उल्लेख केला आहे त्याचे नाव कुणाल बेनोडेकर असं आहे. ‘केनो’ या नावानेही त्याची ओळख आहे. कुणाल हा मूळचा लंडनचा असल्याचं आलं  आहे. कुणाल हा चार्टर्ड अकाउंटेंट असून दुबईत सिनीयर एडजस्टर म्हणून काम पाहतो. 


कुणालचे काही फोटोही पिपींगमून मराठीच्या हाती लागले आहेत. 


सोनाली कुलकर्णी लवकरच कुणालसोबत लग्नबंधनात अडकणार असल्याची चर्चा आहे. एवढच नाही तर याच वर्षी म्हणजेच 2020मध्ये सोनालीचं लग्न होणार असल्याचीही चर्चा आहे. शिवाय लग्नानंतर सोनाली दुबईत स्थाईत होणार असल्याचंही बोललं जातय.

मात्र या सगळ्या गोष्टींमध्ये किती सत्यता आहे हे सोनालीच सांगू शकेल. अप्सराच्या घरी सनई चौघडे वाजणार का ?  याचं उत्तर मिळण्यासाठी सोनाली तिच्या लग्नाविषयीचा खुलासा कधी करते याची वाट पाहावी लागणार आहे. 


 

Recommended

Loading...
Share