Exclusive: सेक्रेड गेम्सला एम्मीसाठी नामांकन हे टीमच्या कष्टाचं फळ - जितेंद्र जोशी

By  
on  

नेटफ्लिक्सवरील प्रसिद्ध वेबसिरीज ‘सेक्रेड गेम्स’ला प्रतिष्ठीत अशा ‘एम्मी अ‍ॅवॉर्ड’ मध्ये नामांकन मिळालं आहे. ‘सेक्रेड’ ला ड्रामा या विभागात नामांकन मिळालं आहे. याप्रसंगी सेक्रेड गेेम्समध्ये काटेकरही व्यक्तिरेखा साकारणारे अभिनेते जितेंद्र जोशी यांनी पीपिंगमून मराठीशी खास बातचीत केली. जितेंद्र म्हणतात, ‘सेक्रेडला नॉमिनेशन मिळालं हे ऐकून खुप आनंद झाला आहे.

अनुराग कश्यप, विक्रम मोटवानी आणि सगळ्या टीमचं हे यश आहे. या सिरीजमध्ये मी साकारलेल्या काटेकरच्या व्यक्तिरेखेने मला आनंदाची अनुभूती दिली. कोणत्याही कलाकारासाठी कामातून मिळणारा आनंद महत्त्वाचा असतो. काटेकर या व्यक्तिरेखेने मला तो दिला.

सेक्रेडसाठी अनुराग कश्यप आणि विक्रमादित्य मोटवानीकडे काम करणं ही एखाद्या कलाकारासाठी पर्वणी असते. या दोघांकडे काम करताना तुम्ही कोण आहात, तुमची पार्श्वभूमी काय या सगळ्याशी काहीही देणं घेणं नसतं तुम्ही केवळ कलाकार आहात हे त्यांच्यासाठी महत्त्वाचं असतं.’

Recommended

Loading...
Share