PeepingMoon Exclusive :

By  
on  

रविवारी प्रशांत दामले आणि कविता मेढेकर यांच्या 'एका लग्नाची दुसरी गोष्ट' या नाटकाचा ५०० व्या प्रयोगाचं झोकात सेलिब्रेशन करण्यात आलं. प्रशांत दामले आणि कविता मेढेकर या जोडीच्या अफलातून अभिनयामुळे या नाटकाला खूप लोकप्रियता मिळाली. त्यामुळेचं तर लॉकडाऊनच्या काळातही या नाटकाने ५०० प्रयोगांचा टप्पा गाठणे ही कौतुकाची गोष्ट आहे.

या नाटकाच्या सेलिब्रेशनच्या वेळी अशोक मामांच्या वयाच्या ७५ वर्षात पदार्पण करण्याचं आणि त्यांच्या कारकिर्दीची ५० वर्ष पूर्ण होण्याचं सेलिब्रेशनही करण्यात आलं. या सेलिब्रेशनला अभिनेते प्रशांत दामले, गौरी दामले कविता मेढेकर, संजय मोने, संगीतकार अशोक पत्की आदी कलाकार उपस्थित होते.

यावेळी रितेशने प्रशांत दामले यांचं अभिनंदन करताना "प्रशांत दामले हे रंगमंचाचे सचिन तेंडुलकर आहेत. त्यामुळे त्यांनी सेंच्युरी करत राहावी आणि आम्ही ती बघायला नेहमीचं येत राहू" असं म्हणत दामलेंचं कौतुक केलं. तर अशोक मामांना शुभेच्छा देताना त्याच्या 'वेड' या सिनेमात काम करण्यासाठी अशोक मामांनी भूमिकेबद्दल काहीही न विचारता लगेच होकार दिला. यावरून त्यांच्या मनाचा मोठेपणा आणि उदारपणाचा प्रत्यय मला वेळोवेळी आल्याचे रितशने सांगितले. त्याचबरोबर 'महाराष्ट्राचा महानायक' म्हणत रितेशने अशोक मामांचे अभिनंदन करत त्यांना शुभेच्छा दिल्या.

प्रशांत दामले यांनी या सेलिब्रेशन वेळी इतक्या वर्षांनी मराठी नाटकाचा ५०० वा प्रयोग झाला असल्यामुळे मी खूप आनंदी असल्याचे म्हटले. "मी अशोक मामांकडून अजूनही शिकायचा प्रयत्न करत आहे. प्रशांत दामले अशोक मामांचं कौतुक करताना म्हटले की "शून्यातून जग कसं उभं करायचं हे मी अशोक मामांकडून शिकलो. अशोक मामांनी कधी मला सुधारवलं नाही, तू तुझा सुधर असंच नेहमी सांगितलं" 

संजय मोने यांनी अशोक सराफ यांचे कौतुक करताना "अशोक मामांनी माझ्यासारख्या कलाकाराला शिस्त लावली. तसेच त्यांच्या काळात त्यांनी अनेक लेखक, दिग्दर्शक, कलाकार आणि तांत्रिक मंडळी यांना जगवले. अशोक मामांबद्दल बोलायला गेलं तर संपूर्ण रात्र कमी पडेल." असं म्हटलं.

उपस्थित इतर मान्यवरांनी देखील अशोक मामांना शुभेच्छा देत पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.

Recommended

Loading...
Share