PeepingMoonExclusive : रितेश देशमुख दिग्दर्शित 'वेड' या सिनेमात अशोक मामा महत्त्वाच्या भूमिकेत!

By  
on  

बॉलिवूडसह मराठीत काम करत असलेला मराठमोळा अभिनेता रितेश देशमुख हा अभिनय, निर्मिती या क्षेत्रानंतर दिग्दर्शन या क्षेत्रात पदार्पण करत आहे. लवकरचं तो दिग्दर्शन करत असलेला वेड सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या सिनेमात त्याच्यासोबत जिनीलिया देशमुख, जिया शंकर आणि शुभंकर तावडे हे कलाकार असल्याचे स्पष्ट झाले होते. मात्र या सिनेमात अशोक मामाही एका महत्वाच्या भूमिकेत असल्याचा खुलासा रितेशने एका कार्यक्रमात केला.

रितेशला इंडस्ट्रीत काम करून २० वर्ष झाली. पण कधी अशोक मामांसोबत काम करण्याचा योग आला नाही. परंतु आता तो दिग्दर्शन करत असलेल्या 'वेड' या सिनेमात अशोक मामांनी काम करावं अशी त्याची इच्छा होती. त्यामुळे रितेशने अशोक मामांना विचारलर असता अशोक मामांनी देखील रोलबद्दल जास्त काही न विचारता लगेच होकार कळवला. यासाठी रितेशने अशोक मामांचे आभार मानत रितेशने त्याच्या वडीलांसारखाचं मनाचा मोठेपणा आणि उदारपणा अशोक मामांमध्ये असल्याचे सांगितले.

रितेश देशमुखच्या आगामी 'वेड' या सिनेमासाठी त्याचे चाहते तर उत्सुक आहेतच, पण अशोक मामांनी या सिनेमात कोणती भूमिका केलीय हे पाहण्यासाठी त्यांचे चाहते देखील आतुर आहेत.

Recommended

Loading...
Share