Exclusive: ‘सेक्रेड गेम्सचं एम्मी अ‍ॅवॉर्डसाठी नामांकन ‘Just amazing’- नेहा शितोळे

By  
on  

नेट्फ्लिक्स वेबसिरीज ‘सेक्रेड गेम्स’ला प्रतिष्ठीत अशा ‘एम्मी अ‍ॅवॉर्ड’ मध्ये नामांकन मिळालं आहे. ‘सेक्रेड’ ला ड्रामा या विभागात नामांकन मिळालं आहे.  याप्रसंगी सेक्रेड गेम्समध्ये  शालिनी काटेकरची व्यक्तिरेखा साकारणारी अभिनेत्री नेहा शितोळे हिने खास ‘पीपिंगमून मराठीशी’ बातचीत केली. नेहा म्हणते,’ सेक्रेड गेम्सला प्रतिष्ठीत एम्मी अ‍ॅवॉर्ड्ससाठी नॉमिनेशन मिळालं हे ऐकून खुप आनंद झाला आहे.

अगदी सहज सांगायचं झालं तर ‘It’s amazing’. शालिनी काटेकरच्या व्यक्तिरेखेने मला ओळख दिलीच शिवाय प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याचा परीघही वाढवला. याशिवाय वेबप्लॅटफॉर्म वर काम करताना कलाकारालाही ब-यापैकी स्वातंत्र्य मिळतं. सिनेमा आणि नाटकांमध्ये काहीशी बंधनं येतात. पण वेबवर तुलनेने अभिव्यक्ती अधिक विस्तारीत आणि सहज होते.’

Recommended

Loading...
Share