Exclusive: पाहा, प्रियंका आणि निकचा साखरपुड्यातील पहिला फोटो

By  
on  

प्रियंका आणि तिचा विदेशी बॉयफ्रेंड निकच्या नात्याची अधिकृत शिक्कामोर्तब झाल्याचे दिसून येत आहे. गुरूवारी रात्री निक आणि त्याच्या आई-वडिलांचे भारतात आगमन झाले आहे आणि याचे निमित्त होते, ते म्हणजे प्रियंका आणि निक भारतात पारंपारिक पध्दतीने साखरपुडा करणार असल्याचे. नुकताच त्यांचा साखरपुड्यातील पहिला फोटो समोर आला आहे. दोघंही पारंपारिक वेशात खुलून दिसतायत.

 

पारंपारिक हिंदू पध्दतीने प्रियंका आणि निक साखरपुड्याचा विधी करताना दिसून येत आहेत. रोका हा विधी पार पडला आहे. प्रियंकाच्या घराबाहेरून पंडितजींना जातानासुध्दा कॅमे-याने कैद केले . पाहुण्यांचीसुध्दा बरीच वर्दळ घराबाहेर दिसून आली.

 

भारतीय पारंपारिक वेश परिधान केलेली निक-प्रियंकाची जोडी खुप गोड दिसतेय. प्रियंकाने लाईट यलो कलरचा सलवार सूट घातलाय तर निक व्हाईट कुर्ता-पायजमामध्ये भारताचा जावई शोभून दिसतोय.

प्रियंकाचा विदेशी बॉयफ्रेंड निक आणि त्याचे कुटुंबिय भारतात आल्यापासून त्या दोघांच्या अधिकृत साखरपुड्याच्या चर्चांना उधाण आलं. आज 18 ऑगस्ट रोजी प्रियंका आणि तिचे कुटुंबिय यांनी आपले भावी व्याही जोनस कुटुंबियांसाठी एका भव्य पार्टीचे आयोजन केले आहे. प्रियंकाने लंडनमध्ये तिच्या वाढदिवशी निकसोबत साखरपुडा केला असल्याचे बोलले जात असून याबाबतची अधिकृत घोषणा आजच्या पार्टीत केली जाणार आहे. दोघंही एकमेकांना अधिकृत अंगठी पार्टीतच घालतील. पण या पार्टीपूर्वीच आज सकाळी प्रियंकाच्या घरातील या धारमिक विधींवरुनच दोघांच्या साखरपुड्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

शुक्रवारी रात्री या लव्हबर्ड्सना रोमॅँण्टीक डिनर डेटला जाताना कॅमे-याने कैद केले. यावेळी दोघेही सर्व जगाचा विसर पडल्यासारखे एकमेकांच्या हातात हात घालून फिरण्यात मश्गूल होते. यावेळी प्रियंकाच्या हातातील अंगठी सर्वांचेच लक्ष वेधून घेत होती.

Recommended

Loading...
Share