भारतीय पोशाखात दिसले प्रियंकाचे भावी सासू-सासरे

By  
on  

आली समीप लग्न घटिका...लवकरच प्रियंका चोप्रा आणि तिचा विदेशी बॉयफ्रेंड निक जोनस लग्नबेडीत अडकणार असल्याची आता चिन्हे दिसू लागली आहेत. दोघांच्याही साखरपुड्याच्या वृत्तावर अधिकृत शिक्कामोर्तब झालं असून घरातच धार्मिक विधी नुकतेच कुटुंबिय आणि जवळच्या मित्र परिवाराच्या साक्षीने पार पडले. या विधी दरम्यान निकचे आई-वडील म्हणजेच प्रियंकाचे सासू-सासरे या विधीसाठी खास पारंपारिक भारतीय पोषाखात दिसले. निकच्या आईने लाईट कलरचा नक्षीकाम केलेला सलवार सूट परिधान केलेला तर वडिलांनी पाढ-या शुभ्र रंगाचा कुर्ता पायजमा परिधान केला होता.

प्रियंकाच्या सासूबाई आणि सासरेबुवा फारच कुतुहलाने भारतीय रोका विधी पाहत होते. त्यांनासुध्दा आता लवकरच सुनबाईंना घरी घेऊन जाण्याची घाई लागल्याचे दिसून येत होते.भारतीय पारंपारिक वेश परिधान केलेली निक-प्रियंकाची जोडी खुप गोड दिसतेय. प्रियंकाने लाईट यलो कलरचा सलवार सूट घातलाय तर निक व्हाईट कुर्ता-पायजमामध्ये भारताचा जावई शोभून दिसतोय.

प्रियंकाचा विदेशी बॉयफ्रेंड निक आणि त्याचे कुटुंबिय भारतात आल्यापासून त्या दोघांच्या अधिकृत साखरपुड्याच्या चर्चांना उधाण आलं. आज 18 ऑगस्ट रोजी प्रियंका आणि तिचे कुटुंबिय यांनी आपले भावी व्याही जोनस कुटुंबियांसाठी एका भव्य पार्टीचे आयोजन केले आहे. या पार्टीला प्रियंका सध्या शुटींग करत असलेल्या द स्काय इज पिंकची संपूर्ण टीम, तसंच मनीष मल्होत्रा, रणवीर सिंग, करण जोहर आदी सेलिब्रिटी हजेरी वावणार आहेत.

प्रियंकाने लंडनमध्ये तिच्या वाढदिवशी निकसोबत साखरपुडा केला असल्याचे बोलले जात असून याबाबतची अधिकृत घोषणा आजच्या पार्टीत केली जाणार आहे. दोघंही एकमेकांना अधिकृत अंगठी पार्टीतच घालतील. पण या पार्टीपूर्वीच आज सकाळी प्रियंकाच्या घरातील या धार्मिक विधींवरुनच दोघांच्या साखरपुड्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

 

 

Recommended

Loading...
Share