आमिर खान आणि अमिताभ बच्चन स्टारर ‘ठग्स ऑफ हिंदुस्थान’ या बहुचर्चित सिनेमाची प्रचंड उत्सुकता प्रेक्षतकांसोबतच संपूर्ण बॉलिवूडलाही लागून राहिली आहे. मि. परफेक्शिन्स्ट आणि बिग बी यांच्यासोबतच सिनेमात कतरिना कैफसुध्दा महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहे. पिंपींगमून डॉट कॉमला सूत्रांनी दिलेल्या एक्सक्ल्युझिव्ह माहितीनुसार यशराज फिल्म्स प्रस्तुत स्टारर ‘ठग्स ऑफ हिंदुस्थान’ सिनेमाचा फर्स्ट लूक 17 सप्टेंबर रोजी म्हणजेच येत्या सोमवारी विश्वकर्मा पूजेच्या दिवशी लॉंच करण्यात येणार आहे. तर ट्रेलर यश चोप्रा यांच्या वाढदिवशी म्हणजेच 27 सप्टेंबरला उलगडणार आहे.
एका मुलाखतीदरम्यान आमिर खान हा अमिताभ यांच्यासोबत ठग्स ऑफ हिंदुस्थान सिनेमात झळकण्याबाबत म्हणाला, “सर्वांसारखाच मीसुध्दा अमिताभ बच्चन यांचा खुप मोठा चाहता आहे. आम्ही जेव्हा रिहर्सलसाठी पहिल्यांदा भेटलो, तो क्षण माझ्यासाठी एका चाहत्याला मिळणा-या आनंदाच्या पर्वणीएवढाच मोठा होता. सिनेमाचे सीन वाचायला आम्ही एकत्रच बसलो होतो. पण त्यांना समोर पाहून मी धड बोलूसुध्दा शकत नव्हतं. माझी जिभच सारखी अडखळत होती आणि अक्षरश: धांदळच उडाली व मी गोंधळून गेलो.”
ठग्स ऑफ हिंदुस्थान हा बॉलिवूडमधील बिग बजेट सिनेमा असल्याचे बोलले जात आहे. एस एस राजा मौली यांच्या बाहुबली सिनेमात वापरण्यात आलेल्या मोठमोठ्या व्हिज्युअल इफेकट्सनंतर आता तशा प्रकारचे इफेकट्स आपल्याला या आगामी सिनेमात पाहायला मिळणार आहेत. विजय कृष्णा आचार्य दिग्दर्शित ठग्स ऑफ हिंदुस्थान हा सिनेमा हिंदीसोबतच तमिळ आणि तेलुगू भाषांमध्येसुध्दा आयमॅक्स आणि 3D मध्ये पाहता येणार आहे.
ठग्स ऑफ हिंदुस्थान हा सिनेमा एका कादंबरीवर आधारित असून येत्या नोव्हेंबरमध्ये प्रदर्शित होणार आहे.