अलीकडेच रोहित शेट्टीने 'सूर्यवंशी' सिनेमाची प्रदर्शनाची तारीख ३१ जुलै २०२० च्या ऐवजी २७ मार्च २०२० रोजी अशी बदलली. २०२० साली ३१ जुलैला ईदच्या पार्श्वभूमीवर सलमान खानचा 'इन्शालाह' हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे दोन सिनेमांची टक्कर टाळण्यासाठी रोहितने सूर्यवंशीच्या प्रदर्शनाची तारीख बदलली.
ईद आणि सलमान खानचा सिनेमा हे एक अनोखा समीकरण सर्वांनाच माहीत आहे. त्यामुळे ईदच्या दिवशी सलमान खानच्या 'इन्शालाह' सिनेमासमोर 'सूर्यवंशी' क्लॅश होऊ नये म्हणून रोहितने सामंजस्याने 'सूर्यवंशी'ची रिलीज डेट २७ मार्च २०२० अशी बदलाली.
परंतु 'सूर्यवंशी'च्या रिलिज डेट बदलण्यामागे खरं कारण मात्र वेगळंच असल्याचं सांगण्यात येत आहे. सूत्रांनी पिपिंगमुनला दिलेल्या माहितीनुसार असं कळालं आहे की 'सूर्यवंशी' सिनेमाच्या शूटिंगचा ४० % भाग पूर्ण झाला आहे. त्यामुळे पुढच्या वर्षीच्या ईदपर्यंत सिनेमा प्रदर्शित होण्याची वाट पाहणं हे अयोग्य होतं. सध्या रोहित या सिनेमाचं उर्वरित भागाचं शूट सध्या हैद्राबाद येथील रामोजी फिल्म सिटी येथे करत आहेत.
याबाबतीत एका सुत्राने खुलासा केला,''अक्षय साठी असा विशेष दिवस काही नसतो. त्याच्यासाठी प्रत्येक दिवस ईद सारखा असतो. येत्या ऑक्टोबर पर्यंत 'सूर्यवंशी' सिनेमाचं शूटिंग संपणार असून पुढे पोस्ट प्रोडक्शनच्या कामासाठी २ महिने लागणार आहेत. त्यामुळे हा सिनेमा नवीन वर्षापर्यंत प्रदर्शित होण्याची शक्यता असताना २०२० च्या ईदपर्यंत वाट का पाहावी?''
अक्षय कुमार असा एकमेव अभिनेता आहे जो वर्षाला तीन किंवा चार सिनेमे पूर्ण करतो. ''मी माझ्या आयुष्याचा पायलट आहे'', असं अक्षय कुमार स्वतःबद्दल नेहमी म्हणतो. सूर्यवंशी सिनेमानंतर अक्षय विनोदी भयपट असलेला 'लक्ष्मी बॉम्ब' सिनेमात झळकणार आहे. तसेच यश राज फिल्म्सच्या 'पृथ्वीराज चौहान' या ऐतिहासिक सिनेमात अक्षय प्रमुख भूमिका साकारत आहे.