Exclusive: बोहल्यावर चढताना प्रियंका चोप्रा आणि निक जोनास देणार या डिझाईनरला पसंती

By  
on  

आली लग्नघटिका समीप! अशीच काहीशी अवस्था आता देसी गर्ल प्रियंका चोप्रा आणि अमेरिकन पॉप सिंगर निक जोनास यांची झाली आहे. दोघांच्याही आयुष्यातील ते अविस्मरणीय क्षण आत्ता फक्त काहीच तासांवर येऊन ठेपले आहेत. जोधपूर येथील भव्य अशा उमेद भवनमध्ये प्रियंका आणि निकचा हा शाही विवाहसोहळा उद्या 2 डिसेंबरला पार पडणार आहे. अवघ्या जगाचं लक्ष आत्ता या विवाहसोहळ्याकडे लागलं आहे.

पण त्यापूर्वीच एक चर्चा रंगलीय म्हणजे हे ग्लोबल सेलिब्रिटी कपल लग्नात कशा प्रकारचे आणि कोणत्या डिझाईनरने डिझाईन केलेल कपडे परिधान करणार. दोन महिन्यांपूर्वीच पार पडलेल्या प्रियंकाच्या रोका विधीसाठी तिने अबू जानी-संदीप खोसला या डिझाईनर जोडीने डिझाईन केलेला ड्रेस घातला होता. म्हणूनच यांनीच डिझाईन केलेला लेहंगा प्रियंका लग्नातसुद्धा घालणार असे बोलले जात होते. पण आत्ता मात्र प्रियंका लग्नात दीपिका पादुकोणच्या पाऊलावर पाऊल ठेवत प्रसिध्द डिझाईनर सब्यासाची मुखर्जीनेच डिझाईन केलेला लेहंगा परिधान करणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

महत्त्वाचं म्हणजे प्रियंकाच नाही तर तिचा विदेशी नवरदेव निकसुद्धा सब्यासाचीने डिझाईन केलेला नवरदेवाचा पोशाख घालणार आहे. अबू-संदीप यांचे ड्रेसेस हे चिकन व नक्षीदार हातकारागिरीसाठी प्रसिद्ध आहेत. तसंच त्यांच्या आऊटफिट्सचा बहुतेक रंग हा व्हाईट, गोल्ड किंवा सिल्व्हर अशा शेड्स किंवा यातील मेळ साधणारा असतो. सुंदर असले तरी ते एखाद्या पंजाबी लग्नाकरिता साजेसे ठरत नसल्याने प्रियंकाने आपल्या वधूच्या खास अशा पोशाखासाठी प्रसिद्ध डिझाईनर सब्यासाचीला पसंती दिली आहे.

दरम्यान, लग्नाआधीच्या पूजेसाठी निकने डिझाईनर मनिष मल्होत्राने डिझाईन केलेला कुर्ता-पायजमा घातला होता. तसंच डिझाईनर पुनीत बलानासुद्धा आत्ता जोधपूरमध्येच आहे, त्यामुळे त्यांचा डिझाईन केलेला ड्रेससुध्दा निक एखाद्या विधीसाठी घालू शकतो.

आत्ता डिझाईनर कुठलाही असो, प्रियंका आणि निकला मात्र वधू-वराच्या पोशाखात पाहण्यासाठी सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली आहे.

 

Tags

Recommended

Loading...
Share