कॅन्सरचं नुसतं नाव काढलं तरी अनेकजण घाबरतात. सध्या कॅन्सरग्र्स्त रुग्ण दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. उत्तम जीवनशैली असणारे बॉलिवूडकरही कॅन्सरच्या कचाट्यातून सुटलेले नाहीत. इरफान खान, सोनाली बेंद्रे या आघाडीच्या कलाकारांनासुद्धा कॅन्सरशी झुंज देताना आपण सध्या पाहतोय.
बॉलिवूडमध्येही अत्यंत कमी वयात कॅन्सरशी झुंज देत असलेल्या व्यक्तींमध्ये सोनाली बेंद्रे, इरफान खान अशी आघाडीची नावं आहेत. या यादीत आणखी एका अभिनेत्याची भर पडली आहे. सुत्रांकडून मिळालेल्या बातमीनुसार बॉलिवूडचा 37 वर्षीय डॅशिंग अभिनेता कॅन्सरच्या कचाट्यात सापडला आहे. या अभिनेत्याला पहिल्या स्टेजचा पोटाचा कॅन्सर झाला आहे. रोमँटिक कॉमेडी उत्तमरित्या सादर करणार्या या अभिनेत्याचं नाव अजून समोर आलेलं नाही. बॉलिवूडमध्ये येण्याआधी त्याने चॉकलेट, कोला आणि टूथपेस्टच्या जाहिरातीतही काम केलं आहे. मुख्य म्हणजे या अभिनेत्याकडून किंवा त्याच्या कुटुंबियांकडून कोणीही माहिती देण्यासाठी माध्यमांसमोर आलेलं नाही. त्यामुळे त्याचं नाव जाहीर झालेलं नाही.
कॅन्सरशी झुंज देणारी पहिली अभिनेत्री म्हणजे नर्गिस दत्त. १९८१ मध्ये नर्गिस यांचा कॅन्सरने मृत्यू झाला होता. त्यानंतर फिरोज खान आणि विनोद खन्ना या दोन मित्रांचा जीवनप्रवासही कॅन्सरनेच संपवला. सुप्रसिद्ध संगीतकार आदेश श्रीवास्तव हे देखील कॅन्सरमुळे काळाच्या पडद्याआड गेले. तर मनीषा कोईराला, लिसा रे यांनी कॅन्सरशी यशस्वीपणे दोन हात केले. याशिवाय ऋषी कपूर, इरफान खान, सोनाली बेंद्रे यांचा लढा अजूनही सुरू आहे. या यादीत अॅड झालेला नवा अभिनेता कोण याचं कोडं मात्र अजून उलगडलेलं नाही.