EXCLUSIVE : ईदला सलमानच्या ‘राधे’सोबतच्या रिलीजची वाट नाही पाहणार ‘सुर्यवंशी’ची टीम, थिएटर्स सुरु झाल्यावर प्रदर्शित होणार सिनेमा 

By  
on  

भारतातही कोरोना व्हायरस या भयानक आजाराचं सावट असल्याने भितीचं वातावरण आहे. त्यातच आगामी बॉलिवुड सिनेमाच्या रिलीज तारखांच्या चुकिच्या बातम्या पसरत आहेत. खिलाडी अक्षय कुमारचा ‘सुर्यवंशी’ हा सिनेमा येत्या 24 मार्चला प्रदर्शित होणार होता. मात्र हा सिनेमा आता 22 मे रोजी ईदला म्हणजेच सलमानच्या ‘राधे’ सिनेमासोबत प्रदर्शित होणार असल्याचं बोललं जातय. कोरोना व्हायरसच्या सुळसुळाटामुळे आणि सिनेमागृहे बंद असल्यामुळे याची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. मात्र सुर्यंवशी सिनेमाच्या फायनल रिलीजच्या या तारखेवर अद्याप शिक्कामोर्तब झालेला नाही. 


पिपींगमूनला मिळालेल्या माहितीनुसार, फिल्ममेकर रोहीत शेट्टी, करण जौहर, अक्षय कुमार आणि प्रोडेक्शन कंपनी रिलायन्स एन्टरटेन्मेंट यांनी ‘सुर्यवंशी’ सिनेमाच्या प्रदर्शनाची कोणतीही तारीख आत्तापर्यंत घोषित केलेली नाही.  त्यामुळे अर्थातच त्यांनी ठरवलेली तारीख ही सलमानच्या ‘राधे’ सिनेमासोबत नसेल यात शंका नाही. याउलट ‘सुर्यवंशी’चे मेकर्स हा सिनेमा प्रदर्शित करण्यासाठी उत्सुक आहेत. म्हणूनच कोरोना व्हायरसमुळे सिनेमागृह, मॉल्स, जिम आणि इत्यादी ठिकाणांची बंदी उठल्यावरचं ते शक्य होणार आहे. मात्र सध्या तरी यावर शिक्कामोर्तब झालेला नाही.  या सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख एप्रिलमध्येच असेल असही बोललं जातय. 
मात्र तरीही अक्षय कुमार आणि सलमान खानचे सिनेमे एकाच दिवशी प्रदर्शित होणार आहेत. कारण अक्षय कुमारचा आगामी सिनेमा ‘लक्ष्मी ब़ॉम्ब’ आणि सलमान खानचा ‘राधे’ हे सिनेमे ईदला प्रदर्शित होणार आहेत. 

Recommended

Loading...
Share