बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन सध्या आपल्या सिनेमांमुळे नेहमीच चर्चेत असतात. त्यांचा नुकताच प्रदर्शित झालेल्या बदला सिनेमा रसिक प्रेक्षकांना प्रचंड भावला. लवकरच ते ब्रम्हास्त्र या सिनेमाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. यानंतर आता पिपींगमूनने मागच्याच आठवड्यात दिलेल्या माहितीनुसार रुमी जाफरी दिग्दर्शित आगामी बर्फ सिनेमात अमिताभ बच्चन आणि इम्रान हाश्मी एकत्र झळकतायत. या दोघांसोबत या सिनेमानिमित्ताने आत्ता आणखी एका अभिनेत्रीचं नाव जोडलं जातंय. ते म्हणजे अभिनेत्री एलियाना डिक्रूझचं.
एलियाना डिक्रूझ ही अमिताभ बच्चन आणि इम्रान हाश्मीसोबत झळकत असलेल्या या सिनेमाचे नाव आत्ता ‘बर्फ: एक खेल’ असे करण्यात आले आहे. हा एक कोर्टरुम ड्रामा असल्याचं पिपींगमूनने तुम्हाला सांगितलंच होतं.जर एलियाना या सिनेमात झळकणार असेल तर ती एक चीट करणारी पत्नी सिनेमात साकारणार आहे.
2008 साली प्रदर्शित झालेल्या गॉड तुस्सी ग्रेट है या सिनेमाच्या दिग्दर्शनापासून रुमी जाफरी यांनी बॉलिवूड पदार्पण केले होत