By  
on  

मंदार तू पुन्हा नव्याने तेवढ्याच ताकदीने उभा राहशील..... या कलाकारांचा मंदार देवस्थळींना दिलासा

सध्या मराठी मालिका विश्वात चर्चा आहे ती मंदार देवस्थळी आणि पैसे थकवल्याच्या प्रकरणाची. कलर्स मराठीवर प्रसारित होत असलेल्या ‘हे मन बावरे’ या मालिकेतील कलाकारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून मंदार देवस्थळी यांच्यावर पैसे थकवल्याचा आरोप केला आहे. शर्मिष्ठा राऊत, मृणाल दुसानिस, शशांक केतकर, संग्राम समेळ या कलाकारांनी सोशल मिडियावर पोस्ट शेअर करत याबाबत मत व्यक्त केलं आहे. 

 

 

यावर मंदार यांनीही पोस्ट शेअर केली आहे. मंदार यांनी मला खरंच खूप लॉस झाला आहे. त्यामुळे माझ्या हातात काहीच नाहीये. ‘ मी स्वत: आता प्रचंड आर्थिक संकटातून जात आहे. मला कोणालाही फसवायचं नाही, कोणाचे पैसे बुडवायचे नाहीत. मी सगळ्यांचे पैसे देईन. पण मी सगळ्याचे पैसे देईन हे नक्की.’  मंदार यांनी सोशल मिडियावर पोस्ट शेअर करताच इतर कलाकार धीर देण्यासाठी पुढे सरसावले आहेत. चिन्मय मांडलेकर, समिधा गुरु, क्षिती जोग, अजिंक्य राऊत यांनी पोस्ट शेअर करत धीर दिला आहे.

 

 

Recommended

PeepingMoon Exclusive