By  
on  

‘नुक्कड’, 'लगान' फेम अभिनेते जावेद खान अमरोही यांचे निधन

‘दूरदर्शन’वरील प्रसिध्द मालिका ‘नुक्कड’मधून घरोघरी लोकप्रिय झालेल्या कलकारांपैकी एक अभिनेते जावेद खान अमरोही यांचे मंगळवारी निधन झाले.80 च्या दशकांत ही मालिका प्रचंड लोकप्रिय ठरली होती.  या मालिकेने जावेद खान यांना ओळख मिळाली होती. त्यानंतर 'लगान' या आमिर खानच्या सिनेमात त्यांची भूमिका होती. मॅच जिंकल्यावरचा आनंद सिनेमात पाहायला मिळाला होता. गेले वर्षभर जावेद खान हे आजारपणामुळे अंथरुणाला खिळून होते. 

 जावेद खान ऐशीच्या दशकातील लोकप्रिय चरित्र कलाकारांपैकी एक होते. ‘अंदाज अपना अपना’, ‘लगान’, ‘इश्क’, ‘हम है राही प्यार के’, ‘चक दे इंडिया’ अशा कित्येक अलिकडच्या चित्रपटातून त्यांनी भूमिका साकारल्या. 

संजय दत्त, पूजा भट, आलिया भट आणि आदित्य रॉय कपूर अभिनीत ‘सडक २’ हा जावेद खान यांचा कारकिर्दीतील अखेरचा चित्रपट ठरला.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive