‘जॉबलेस’च्या सेटवर पाल आली आणि.......’ पाहा हा धमाल व्हिडियो

By  
on  

पाल या प्राण्याला आपल्यापैकी अनेकजण घाबरतात. पालीला पळवण्याचे अनेक उपाय केले जातात. पण जॉबलेस या वेबसिरीजच्या सेटवर मात्र हटके पद्धतीने पालला पळवली जात आहे. सुव्रत जोशीने एक धमाल व्हिडियो शेअर केला आहे. 
यामध्ये अभिनेता हरिष दुधाडे पाल पळवण्यासाठी ‘पाल गीत’ म्हणताना दिसतो आहे. या पोस्टच्या भल्या मोठ्या कॅप्शनसहित हा किस्सा शेअर केला आहे.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sula (@suvratjoshi)

 

तो म्हणतो, पाल"गीत... Watch till end
आमचे 'Pal',"पाल"न करते,Jobless चे प्रोड्युसर आणि सहकलाकार @harishdudhade_official यांनी काल कलात्मक पद्धतीने पालीला घालवायचा प्रयत्न केला, मग त्यात कडवे घालून आम्हीही पालिंविरुद्धचे युद्ध अधिक कडवे केले. असाच समागम त्यांनी निर्माण केलेल्या "Jobless" मध्ये पण तुम्हाला पाहायला मिळेल.

तोपर्यंत तुम्ही प्रेक्षकांनी नियमांचे "पाल"न करून हा व्हिडीओ पहावा! आमच्या 'जॉबलेस" मधील सहकलाकार @mayurri.wagh_official यांना मी हा व्हिडिओ बघण्याचे आव्हान देत आहे! नावात वाघ असलेली ही व्यक्ती "पाल" पहिली की "पाला"यन करते. पुढील वेळी या गाण्याचे स्मरण करावे,संकट 'पालून' जाईल.
कोण कोण पालीला घाबरतात? कमेंट मध्ये हात वर करा किंवा टॅग मारा!’ फॅन्स मात्र सुव्रतचा हा धमाल व्हिडियो पाहून पोट धरुन हसत आहेत.

Recommended

Loading...
Share