‘सोन्याची पावलं’ मालिकेत दिसणार ही अभिनेत्री, साकारते आहे खास व्यक्तिरेखा

By  
on  

कलर्स मराठी वाहिनीवरील 'सोन्याची पावलं' या मालिकेत उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय. विविध संकटांवर मात करून इनामदार घराण्यातल्या सर्वांची मनं भाग्यश्रीने जिंकून घेतली आहेत. पण या सगळ्या धामधुमीत मालिकेत एक नवी एंट्री होणार आहे. या मालिकेत आता अभिनेत्री सई देवधरची एंट्री होणार आहे.

 

 

सईने नुकताच तिचा नव्या व्यक्तिरेखेतील फोटो शेअर केला आहे. यामध्ये सई देवीच्या मेक अपमध्ये दिसते आहे. सईची आई श्रावणी देवधर आणि सई या दोघी मालिकेची निर्मिती करत आहेत. आता सईच्या हटके लूकने चाहत्यांच्या मनात उत्सुकता निर्माण केली आहे.

Recommended

Loading...
Share