बिग बॉसच्या चावडीनंतर आदर्श शिंदेची भावाच्या समर्थानार्थ पोस्ट चर्चेत?

By  
on  

वीकेंडचा दिवस म्हणजे बिग बॉसच्या घरातील चावडीचा दिवस. यावेळी आठवडाभरात घडलेल्या घडामोडींवर सुत्रसंचालक महेश मांजरेकरांची करडी टिप्पणी असते. काल मात्र महेश यांचा हटके अंदाज पाहायला मिळाला. कॅप्टन असलेल्या उत्कर्षला ही महेश यांनी खडे बोल सुनावले. यानंतर चर्चेत आहे ती उत्कर्षचा भाऊ आदर्श शिंदेची पोस्ट.

 

 

आदर्श आपल्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये म्हणतो, ‘Youtube वर आणि Social Media वर सगळेच शाळा घेताना दिसत आहेत, तर म्हटलं आपण पण घेऊच… शाळा… माझ्या या चावडीवर..’ आता आदर्श त्याच्या चावडीवर काय मुद्दे मांडणार याची उत्सुकताही आहे. विशेष म्हणजे नेटिझन्सनीही आदर्शच्या या पोस्टवर संमिश्र कमेंट्स केल्या आहेत.

Recommended

Loading...
Share