प्रियंका चोप्रा जोनास आणि परिणिती चोप्रा या बहिणी 'फ्रोजन सिस्टर्स'ना देणार आवाज

By  
on  

फ्रोजन हा एक अब्जावधी डॉलरचा चित्रपट असून त्याला जगभरात कौतुक मिळाले आहे. त्याचा सिक्वेल आपल्याला एक सुंदर पटकथा, व्यक्तिरेखा आणि पुन्हा एकदा एक सिनेमॅटिक अनुभव देणार आहे, जो आपल्यावर दीर्घकाळ टिकणारा परिणाम साधेल. पालक आणि प्रत्येक मुलीला आवडणारा घराघरात पोहोचलेला एक ब्रँड म्हणून आलेला फ्रोजन भारतीय प्रेक्षकांना एल्सा आणि एनाच्या नवीन रूपात नक्कीच आवडेल. कारण त्यात त्यांच्या लाडक्या बॉलीवूड अभिनेत्रींनी आपले आवाज दिले आहेत.

फ्रोजन २ च्या जागतिक पातळीवरील रिलीजच्या निमित्ताने उत्साह ओसंडून वाहत असताना डिस्ने भारतीय प्रेक्षकांसाठीही  आणण्यासाठी उत्सुक आहे. प्रियंका चोप्रा जोनास आणि परिणिती चोप्रा यांना या एनिमेटेड फिचर फिल्मच्या एल्सा आणि एना यांच्या आवाजासाठी सहभागी करून घेण्यात आले आहे.

या निमित्ताने बोलताना अभिनेत्री प्रियंका चोप्रा जोनस म्हणाली की, ''एल्सा ही एक नाट्यमय व्यक्तिरेखा असून तिची मते ठाम आहेत आणि ती संतुलित विचार करणारी आहे. ही माझ्या स्वभावाची वैशिष्टे आहेत. मला याचमुळे या फिल्मचा भाग बनावेसे वाटले, शिवाय आमच्या स्थानिक प्रेक्षकांना सर्वांत यशस्वी एनिमेटेड फिल्म्सपैकी एक दाखवण्याची सुंदर संधी मिळणार आहे. परिणिती एनाच्या व्यक्तिरेखेला आपला आवाज देणार आहे हे ऐकून मला खूप आनंद झाला आहे. आम्ही दोघींनी यापूर्वी एकत्र काम केलेले नाही आणि एकत्र येण्यासाठी हा एक उत्तम सिनेमा आहे. त्यामुळे मला अविस्मरणीय आठवणी मिळणार आहेत.''

या घोषणेबाबत बोलताना अभिनेत्री परिणिती चोप्रा म्हणाली की, ''डिस्नेची राजकुमारी होण्याचे स्वप्न पाहण्यासाठी तुम्हाला अभिनेत्रीच व्हायला पाहिजे असे नाही. मला पहिला चित्रपट खूप आवडला. तो माझा आवडता एनिमेशन चित्रपट आहे. पण मला एनाला आवाज देण्याची संधी मिळेल असे वाटले नव्हते. अर्थातच, माझ्या खऱ्या आयुष्यातल्या बहिणीसोबत बहिणींबाबतचा चित्रपट करायला मिळतोय ही खूप आनंदाची गोष्ट आहे. डबिंग करत असताना खऱ्या आयुष्यातही आम्ही आमच्या व्यक्तिरेखांसारख्या आहोत हे जाणवून हसत राहू. मिमी दिदी ही खरोखरंच एल्सासारखी आहे आणि मी एनासारखी आहे. याचमुळे हा चित्रपट खूपच खास आहे. मला प्रेक्षकांच्या प्रतिसादाची उत्सुकता आहे.''

एल्साला आपण जादुई शक्तींसोबत का जन्माला आलो असा प्रश्न पडलेला असताना एना कायम आशावादी आणि आनंदी मुलगी आहे. या दोन्ही व्यक्तिरेखा एकमेकांपासून खूप वेगळ्या असल्या तरी हा चित्रपट विरोधी बाजू कशा आकर्षित होतात आणि एकमेकांमधील सर्वोत्तम कसे बाहेर आणतात हे दाखवतो. चॉक आणि चीजसारख्या दोन व्यक्तिरेखा असलेल्या प्रियंका आणि परिणिती यांच्या भूमिकेसह हा चित्रपट एल्सा आणि एनाला त्यांच्या आवाजाची खोली देतो.

“एल्सा आणि एना या दोघी बहिणींना युवा मुलींमध्ये जगभरात खूप मोठा चाहतावर्ग आहे. प्रियंका आणि परिणिती यांचा आवाज त्या दोघींना देणे उत्तम ठरले. एक व्यक्तिरेखा असण्यापासून एल्सा ही एक सुपरहिरो झाली आहे आणि आता जगभरातील मुली तिच्याशी स्वतःला जोडू पाहतात. ती आणि एना आपल्या शक्तिशाली व्यक्तिरेखांमुळे मुलींचे सबलीकरण करतात. या दोघींमधील नाते इतके मजबूत आहे की, आम्हाला या दोन्ही भूमिकांसाठी खऱ्या बहिणी आणायच्या होत्या. या दोघींमधील नाते प्रियंका व परिणितीमध्येही दिसते आणि त्यामुळे चित्रपट पाहण्याचा अनुभव नक्कीच विस्तारित होऊ शकेल,'' असे मत डिस्ने इंडियाचे स्टुडिओ एंटरटेनमेंट विभागप्रमुख विक्रम दुग्गल यांनी व्यक्त केले.

२०१३ मध्‍ये चित्रपट 'प्‍लेन्‍स'मधील इशानी भूमिकेसाठी आवाज, २०१६ मध्‍ये 'द जंगल बुक'च्‍या हिंदी आवृत्‍तीमध्‍ये का भूमिकेसाठी आवाज दिल्‍यानंतर 'फ्रोजन २' हा प्रियंका चोप्रा जोनसचा डिस्नेसोबत तिसरा चित्रपट असणार आहे. तिने या चित्रपटासाठी तिचा आवाज दिला आहे.

 

Recommended

Loading...
Share