प्रसिध्दी एखाद्या नशेप्रमाणे असते, जी चढते आणि उतरतेही: धमेंद्र

By  
on  

धर्मेंद्र, सनी आणि बॉबी देओल यांच्या यमला पगला दिवान या सिरीजचा यमला पगला दिवाना फिरसे हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या सिनेमातील धर्मेंद्र यांचा अभिनय आणि अंदाज कुठल्याही तरूण अभिनेत्याला लाजवेल असाच आहे. नुकताच पिपींगमून डॉट कॉमने यानिमित्त सुपरस्टार धर्मेंद्रजींसोबत खास बातचित केली.

आपल्या उत्साह आणि अभिनयातील सळसळत्या उर्जेबद्दल बोलताना धर्मेंद्रजी म्हणतात, “मला नेहमीच प्रेक्षकांना असं काहीतरी द्यायला आवडतं, ज्यामुळे त्यांना आनंद मिळेल व त्याचं छान मनोरंजनसुध्दा होईल. प्रत्येक अभिनेत्याला वाटतं, त्याला प्रेक्षकांचं प्रेम मिळावं. प्रसिध्दी वगैरा क्षणभंगूर असते. एखाद्या नशेप्रमाणे ती चढते आणि उतरूनसुध्दा जाते. म्हणूनच मी इथे फक्त प्रेक्षकांचं प्रेम मिळविण्यासाठी आहे.”

 

सिनेमांच्या प्रमोशनमदरम्यान धर्मेंद्रजी कधी दिसले नाहीत, परंतु यमला पगला दिवाना फिरसेनिमित्त त्यांनी प्रमोशनमध्ये भाग घेतला. त्यांच्या मते सिनेमाचं प्रमोशन करुन त्याबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण करणं हा जणू हा आता एक ट्रेंडच बनला आहे आणि आजच्या काळासाठी ते फार आवश्यक असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

सिनेइंडस्ट्रीत 60 वर्ष अविरत आपल्या विविध अप्रतिम भूमिकांद्वारे प्रेक्षकांचं मनोरंजन करणा-या धर्मेंद्रजींना फ्रायडे रिलीजचे दडपण वाटते का, कारण आता तुमचा सिनेमा यमला पगला दिवाना फिरसे प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. तेव्हा ते म्हणतात “ कुठेतरी वाटतं दडपण आणि हे स्विकारायला मला अजिबात कमीपणा वाटत नाही. आपल्याला सिनेमाच्या प्रदर्शनानंतरचं भविष्य खरंच माहित नसतं. प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळणार हे आपल्या हातात नसतं. पहिला यमला पगलाचा भाग सुपरहिट ठरला तर दुसरा फ्लॉप झाला म्हणून त्या दु:खात पहिल्या भागाच्या यशाचा आनंद विसरुन गेलो आम्ही. जोपर्यंत प्रेक्षक म्हणत नाहीत, धर्मेंद्र यांचा सिनेमा चांगला होता, तोपर्यंत काही खरं नसतं.”

धर्मेंद्रजी यांना यमला पगला दिवाना फिरसे येत्या 31 ऑगस्टला प्रदर्शित होत आहे, त्यानिमित्ताने मराठी पिपींगमूनतर्फे खुप खुप शुभेच्छ!

 

 

Recommended

Loading...
Share