By  
on  

PeepingMoon Exclusive: दरवर्षी लालबागच्या राजाचं न चुकता दर्शन घेते - ऋतुजा बागवे

 सर्वत्र गणरायाचं जल्लोषात आगमन झालं आहे. गणपतीचे हे दहा दिवस भक्तीमय आनंद आणि हर्षोल्हास घेऊन प्रत्येकाला सुखावून टाकतायत. बाप्पाच्या सेवेत सर्वच तल्लीन झाले आहेत. नांदा सौख्य भरे,  चंद्र आहे साक्षीला या मालिकांमधून छोटा पडदा गाजवणारी आणि अनन्या या नाटकाद्वारे अनेक नवे विक्रम रचणारी सशक्त अभिनेत्री ऋतुजा बागवे हिच्यासोबत गणेशोत्सवानिमित्त पिपींगमून मराठीने केलेली ही खास बातचित.

 

गणपती बाप्पा आणि तुझं नातं कसं आहे

- माझं आणि बाप्पाचं खुप जवळचं  नातं आहे.  माझा वाढदिवस हा गणपतीच्या आसपासच असतो. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात. त्यामुळे माझ्यासाठी गणेशोत्सव खुप खास आहे. लहानपणी आई नेहमी सांगायची चांगलं वागलं की बाप्पा आपल्याला हवं ते देतो. मी मुंबईतील परळ भागातच राहते. त्यामुळे दरवर्षी नित्यनेमाने लालबागच्या राजाच्या दर्शनाला जाते. इथे गल्लोगल्ली बाप्पा विराजमान होतात. मोठमोठे देखावे मिरवणूका रंगतात. त्यामुळ ह्या  वातावरणात हरखून जाते. इथल्या गणेशोत्सवाची बातच काही और आहे.  पण सध्या करोनामुळे मागच्या वर्षीपासून आपण सर्वचजण या उत्साहाला मिस करतोय. 

 

 

  बालपणीची काही गणपतीतली आठवण 

-      आमच्या घरी गणपती नसतो. पण सर्वत्र नातेवाईकांकडे आणि मी म्हटलं तसं आमच्या परळ विभागात बरेच सार्वजनिक गणपती असतात. पण एकदा लहान असताना मी आणि माझ्या बहिणीने हट्टाने बाप्पाची मूर्ती घरी आणली. मग आईने त्याची यथांसाग पूजा-अर्चा नैवेद्य दाखवून दीड दिवसांनी त्याचं विसर्जन केलं. पण त्यानंतर तिने आम्हाला समजावलं की असंच गणपती बाप्पा आपण आपल्या हट्टाने बसवू शकत नाही. त्यामुळे ही आठवण खुप खास आहे. 

 

.  तुला मोदक करता येतात का?

हो अगदी छान सुबक मोदक मी करते. बाप्पाच्या आवडीचे उकडीचे मोदक तयार करायला आणि त्यावर ताव मारायला मला फार आवडतं. 

 

 

बाप्पाकडे यंदा काय मागणार?

-    बाप्पाकडे हेच मागायचं कीअजूनही करोनाचं संकट टळलं नाहीय, तेव्हा जबाबदारीने वागण्याची सर्वांना सुबुध्दी दे. तसंच गणपती हा कलेचा अधिपती आहे. गेले दीड वर्ष नाटयगृह, सिनेमागृह बंद आहेत. त्यामुळे लवकरात लवकर हे आपल्यावरचं विघ्न सरु दे आणि कलाकारांना त्यांच्या कामावर व पुन्हा नव्या जोशाने रंगमंचावर परतू दे.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive