ज्या सिनेमाला हात लावेल त्याचे सोनं करून टाकणारा दिग्दर्शक म्हणजे रोहित शेट्टी. रोहितने आपल्या डिरेक्टोरिअल टचने अनेक सिनेमांना यशापर्यंत नेऊन पोहोचवलं. सिंबा देखील याच यादीतील एक सिनेमा. सध्या सगळीकडे सिंबाचा डंका वाजत असताना प्रत्यक्षात रोहितला या यशाबद्दल काय वाटतं ते जाणून घेऊ या मुलाखतीमधून...
तुझ्याकडे आधीपासूनच सिंघम असताना सिंबाच्या निर्मितीचं कारण काय?
मुळातच सिंबा आणि सिंघम खुप वेगळे आहेत. सिंबा लालची आणि भ्रष्ट आहे. प्रामाणिकपणा आणि त्याचं वाकडं आहे. मी सिंबाला सिंघमसाराखा प्रेझेंट केला असता तर प्रेक्षक नक्कीच कंटाळले असते. जेव्हा सिंघम रिलीज झाला तेव्हा देखील लोकांनी हाच प्रश्न विचारला होता की, दबंग असताना सिंघम कशाला? पण बाजीराव सिंघम आणि चुलबुल पांडे या दोन्ही व्यक्तिरेखा एकसारख्या नव्हत्या. त्यामुळे सिंबादेखील या दोघांपेक्षा कैकपटीने वेगळा आहे.
सिंबा किंवा सिंघम तू रणवीर किंवा अजयला नजरेसमोर ठेवूनच या भूमिका लिहिल्या आहेस का?
याचं उत्तर नाही असंच आहे. कारण मी जेव्हा ‘टेंपर’ हा तेलुगु सिनेमा पाहिला तेव्हाच सिंबा बनवण्याचं नक्की केलं होतं. एका अॅड शूटवेळी मी रणवीरला सिंबामध्ये काम करण्याबद्द्ल विचारलं. त्याने होकार दिला. आता तुम्ही पाहू शकता, सिंबाला रणवीर इतका न्याय कुणीच देऊ शकलं नसतं. मला नक्की कसा सिनेमा बनवायचा आहे हे मनाशी ठरवल्यानंतरच मी कलाकरांची निवड करतो. त्यामुळे एखादी व्यक्तिरेखा कोण साकारणार हे पूर्णतया कथानकावर अवलंबून असतं.
रोहित शेट्टीच्या सिनेमांची ओळख काय आहे? म्हणजे जेम्स बॉण्ड म्हटलं की स्पोर्ट्स कार, सुंदर ललना, अॅक्शन, पाठलाग हे सगळं डोळ्यासमोर येतं. तू ब्रॅण्ड रोहित शेट्टीबद्दल काय सांगशील?
माझ्या सिनेमाच्या प्रेक्षकवर्गाचा आवाका मोठा आहे. लोक कुटुंबासहित माझे सिनेमे पाहू शकता. त्यामुळे माझा सिनेमा प्रत्येकासाठी असतो असं मला आवर्जून सांगावसं वाटतं. मला वाटतं ब्रॅण्ड रोहित शेट्टी म्हणजे हेच आहे.
दिग्दर्शक म्हणून तुला कोणत्या प्रकारचा सिनेमा शूट करायला आवडतो, अॅक्शन कि कॉमेडी?
मला एका विशिष्ट प्रकारचेच सिनेमे करायला आवडतात असं काही नाही. मला मनोरंजन करणा-या पटकथेवर काम करायला आवडतं. मग तो सिनेमा अॅक्शन आहे कि कॉमेडी याने काही फरक पडत नाही.
https://www.youtube.com/watch?time_continue=30&v=LbLNSnsvA0Q