एक गुणी अभिनेत्री म्हणून मृण्मयी देशपांडेला आपण सर्वच ओळखतो. पण तिने एक गुणी दिग्दर्शिका असल्याचंसुध्दा समोर आलं आहे. आता मृण्मयी एका हटके अंदाजात समोर येणार आहे. मृण्मयी आता होस्टपदी विराजमान होणार आहे.लवकरच मराठी सारेगमप लिट्ल चॅम्पचा शुभारंभ होतो आहे. या शोच्या होस्टपदी मृण्मयी दिसणार आहे.
या शोचे प्रोमो समोर आले आहेत. या शो मध्ये आर्या आंबेकर, रोहित राऊत, कार्तिकी गायकवाड, मुग्धा वैशंपायन आणि प्रथमेश लघाटे हे ज्युरी म्हणून दिसून येणार आहेत. त्यामुळे या शो ची उत्सुकता अधिक वाढली आहे.