लॉकडाऊनच्या काळात अनेक कपल्सनी लॉंग-डिस्टन्स रिलेशनशिपचा अनुभव घेतला. यातून अनेकांना ब-याच गोष्टी समजल्या. कोणी या कळात जास्त जवळ आलं तर कोणी पार लांब गेले. ते प्रत्येकावर आणि त्यांच्या नात्यावर अवलंबून आहे. याच विषयावर आधारित आजच्या जनरेशनची हलकी-फुलकी रोमॅण्टीक कॉमेडी असलेली ‘अधांतरी’ ही नवी कोरी वेबसिरीज प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. सर्वांचा लाडका हॅण्डसम हंक अभिनेता सिध्दार्थ चांदेकर आणि गोड अभिनेत्री पर्ण पेठे ही फ्रेश जोडी यानिमित्ताने एकत्र झळकतेय.
‘अधांतरी’निमित्ताने पिपींगमूनमराठीने अभिनेता सिध्दार्थ चांदेकरसोबत केलेली ही एक्स्क्लुझिव्ह बातचित.
- अधांतरीचा मुकूल आणि तुझ्यात काय साम्य आहे?
- सिध्दार्थ आणि या वेबसिरीजमध्ये मी साकारत असलेली मुकुल ही व्यक्तिरेखा यांच्यात बरंच साम्य आहे. दोघंही उत्तम शेफ आहेत. मीसुध्दा त्याच्यासारखेच उत्तम पदार्थ बनवतो. प्रेम करायचं ठरवल्यानंतर ते निभावण्यासाठी वाट्टेल ते करण्याची जशी मुकुलची तयारी असते, तसाच सिध्दार्थही आहे. त्यामुळे ही भूमिका अगदी माझ्या जवळपास जाणारी आहे, फरक इतकाच की मी मला जे काही महत्त्वाचं सांगायचं आहे, मनातलं काही आहे ते लगेच बोलून मोकळा होतो. पण मुकुलचं तसं नाहीय, तो यासाठी बराच वेळ घेतो. तो थोडासा संकोची आहे
-
. तुझ्या आणि पर्णच्या केमिस्ट्रीबद्दल काय सांगशील?
- मी आणि पर्ण एकत्र काम हे पहिल्यांदाच करतोय, पण आमची ओळख व मैत्री कॉलेजपासूनची आहे. ती पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजची आणि मी एसपी कॉलेजचा विद्यार्थी पण आम्ही स्पर्धांनिमित्ताने अनेकदा एकत्र यायचो. आमचे मित्र-मैत्रिणीसुध्दा बरेच कॉमन आहेत. त्यामुळे आमची इच्छा होती एकत्र काम करायची आणि ती इतक्या वर्षांनी अधांतरी वेबसिरीजच्या निमित्ताने अगदी परफेक्ट जुळून आली. ती टोटल क्रेझी मुलगी आहे. मी तिला आधीपासून ओळखत होतो पण या शुटींगच्या निमित्ताने आम्ही एकमेकांना जाणून घेऊ शकलो व आमच्यात घट्ट मैत्री झाली. खुप छान बॉंडींग झालं. आम्ही दोघंही प्रचंड खवय्ये आहोत, त्यामुळे आम्ही सेटवरती प्रचंड खादाडी केली तीसुध्दा स्वत: पदार्थ बनवून. एकूणच पर्णसोबत काम करण्याचा अनुभव खरंच छान होता,मजा आली.
अधांतरी या वेबसिरीजमध्ये प्रेक्षकांना नेमकं काय पाहायला मिळेल?
- ही मुकुल आणि मुग्धाच्या रिलेशनशिपची गोष्ट आहे. मुकुल पुण्याचा तर मुग्धा मुंबईची. दोघंही लॉंग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये आहेत. फक्त वीकेंड्सना ते एकमेकांना भेटतात. मजा-मस्ती करतात आणि आपापल्या कामांना निघून जातात. पण एकदा त्यांना लॉकडाऊनमुळे अचानक २१ दिवस सतत एकत्र रहावं लागतं. तेव्हा नेमकं त्यांच्यात काय घडतं. ते एकमेकांची स्पेस कशी जपतात. एकमेकांच्या सवयींशी कसं जुळवून घेतात, कसे खटके उडतात. त्यांची रिलेशनशिप वर्कआऊट होते की नाही, हे यात पाहायला मिळेल. रिलेशनशिपमध्ये असलेल्या प्रत्येकाला ही हलकी-फुलकी गोष्ट रिलेट करणारी ठरेल यात शंका नाही.
. या वेबसिरीजप्रमाणे लॉंग डिस्टन्स रिलेशनशिप काही काळासाठी जर 24-7 सतत सोबत असली की खरंच कंटाळवाणी नकोशी होते का, मत जाणून घ्यायचंय
- कुठलीही रिलेशनशिप ही एका पॉंईटनंतर कंटाळवाणीच होते, हे माझं प्रामाणिक मत आहे. पण त्या कंटाळ्यावर मात करुन त्या नात्याची गंमत किंवा त्यातला जो अपेक्षित स्पार्क आहे तो टिकविण्यासाठी काय प्रयत्न केले जातात हे आज खरंच खुप जास्त गरजेचं आहे. नातं कुठलंही असो पण ते छान टवटवीत ठेवण्यासाठी प्रयत्न करणं हे आपल्या हातात आहे.
नातेसंबंध टिकविण्यासाठी कुठली गोष्ट महत्त्वाची असते असं तुला वाटतं?
- मला असं वाटतं कुठल्याही नात्यात आदर महत्त्वाचा असतो. आपण थोरा-मोठ्यांना देतो तो आदर नव्हे, तर समोरच्याला जपण्याचा तो आदर असतो.आपल्यामुळे त्याला बदलावं लागूनये यासाठी तो आदर राखणं गरजेचं आहे, असं मला वाटतं. माझ्यासाठी तरी नात्यातला आदर जपणं महत्त्वाचा वाटतो.