सैराटचा परश्या लॉकडाउनमध्ये मिस करतोय ही गोष्ट

By  
on  

लॉकडाउनमध्ये सगळ्यांनाच घराबाहेर जावसं वाटतय. मात्र ते सध्या शक्य नाही. सैराट फेम अभिनेता आकाश ठोसरही घरात राहून असाच कंटाळलेला दिसतोय. हे त्याची नुकतीच केलेली सोशल मिडीया पोस्ट सांगतेय. 
नुकतेच त्याने त्याच्या ट्रीपचे काही फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंत मनसोक्त बर्फात लोळतानाचा, बाईक राईड करतानाचा आकाश पाहायला मिळतोय. हे फोटो त्याच्या लदाख येथील ट्रीपचे आहे.

 

सध्या या ट्रीपला आकाश प्रचंड मिस करतोय. आणि म्हणूनच या ट्रीपचे काही खास क्षण त्याने पोस्ट केले आहेत. या पोस्टमध्ये आकाश म्हणतो की त्याला या ठिकाणी जायला नेहमीच आवडतं. 


‘सैराट’ या सिनेमातून आकाशची परश्या म्हणून ओळख निर्माण झाली होती. त्यानंतर ‘एफ यू’ या मराठी सिनेमातही आकाश झळकला होता. ‘लस्ट स्टोरीज’ या हिंदी वेब फिल्ममध्येही आकाश झळकला होता.
 

Recommended

Loading...
Share